पुणे : बाळासाहेबांच्या शिवसेनेचे माथाडी जिल्हाध्यक्ष निलेश माझीरे यांच्या पत्नीने आत्महत्या केल्याची माहिती समोर आलीय. ही धक्कादायक घटना काल रात्रीच्या सुमारास घडलीय.
निलेश माझीरे यांच्यावर पुणे जिल्ह्याची माथाडी कामगार सेनेची जबाबदारी आहे. माझीरे यांच्या पत्नीने विष प्राशन केल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे.
निलेश राणे यांच्या पत्नीने आत्महत्या का केली? याचं कारण अद्याप समजू शकलेलं नसून कौटुंबिक वादातून ही आत्महत्या केल्याची चर्चा नागिरकांमध्ये सुरु आहे.
दरम्यान, माझीरे आधी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत होते. त्यानंतर त्यांनी बाळासाहेबांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. माझीरे यांची मनसेला ‘जय महाराष्ट्र’ करत जवळपास ४०० कार्यकर्त्यांना सोबत घेऊन बाळासाहेबांच्या शिवसेनेत प्रवेश केला होता.