काँग्रेसच्या ‘गुंगी गुडिया’ टिकेला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचं एका वाक्यात उत्तर

काँग्रेसच्या या उल्लेखानंतर पक्षातील कार्यकर्त्यांकडून ठिकठिकाणी काँग्रेसविरोधात आंदोलन केले जात आहे.

News Photo   2026 08 04T193144.030

काँग्रेसच्या 'गुंगी गुडिया' टिकेला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचं एका वाक्यात उत्तर

काँग्रेसने उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचा गुंगी गुडिया असा उल्लेख केला आहे. काँग्रेसच्या या उल्लेखानंतर राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. अजित पवार यांच्या पक्षातील कार्यकर्त्यांकडून ठिकठिकाणी काँग्रेसविरोधात आंदोलन केले जात आहे. काँग्रेसने आपले विधान मागे घ्यावे, अशी मागणी केली जात आहे. दरम्यान, आता स्वत: उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी  काँग्रेसच्या गुंगी गुडिया टिकेला एका वाक्यात उत्तर दिलं आहे.

माध्यमांनी आपल्यावर काँग्रेसकडून अशी टिका करण्याता आली असं विचारलं असता, “मी वेळ आल्यावर चोख उत्तर देईल” अशी प्रतिक्रिया सुनेत्रा पवार यांनी दिली आहे. राज्यभरात आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून काँग्रेस पक्षाचा निषेध केला जात असताना सुनेत्रा पवार काय उत्तर देतात याची सर्वांनाच उत्सुकता लागली होती.

Exit mobile version