Download App

पुणेरी पगडी ! शोभतेय का ?; लोकसभेसाठी इच्छुक सुनील देवधरांनी विचारला प्रश्न

  • Written By: Last Updated:

पुणे : लोकसभेच्या निवडणुकांचे बिगुल अद्याप वाजण्यास वेळ असला तरी, पुणे लोकसभेसाठी (Pune Loksabha) अनेक दिग्गजांच्या नावाची जोरदार चर्चा सध्या सुरू आहे. त्यातील एक नाव म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी प्रचारक, भाजपचे माजी राष्ट्रीय सचिव सुनील देवधर (Sunil Deodhar) यांचे. आतापर्यंत देवधर पुण्यातून लोकसभा लढवण्यास इच्छुक असल्याची माहिती समोर आली होती. मात्र, आता खुद्द देवधर यांनीच एक प्रश्न उपस्थित करत लोकसभेसाठी आपल्या नावाची तजवीज करून ठेवली आहे. यावर काही नेटकऱ्यांनी आपली मते व्यक्त केली आहेत. (Sunil Deodhar Post On Social Media Platform)

Manoj Jarange : पाच अटी अन् 12 ऑक्टोबरला विराट सभा; जरांगे पाटील काय म्हणाले?

आतापर्यंत आगामी लोकसभेसाठी पुण्यातून माजी महापौर मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol), भाजपचे माजी शहराध्यक्ष जगदीश मुळीक, माजी खासदार संजय काकडे (Sanjay Kakde) आणि गिरीश बापट यांच्या सुनबाई स्वरदा बापट यांच्या नावाच्या चर्चा आघाडीवर होत्या. मात्र अचानक या नावांना मागे टाकत सुनील देवधर यांचे नाव चर्चेत आले आहे. त्यानंतर आज (दि.12) देवधर यांच्या पुणेरी पगडीतील फोटोने विविध चर्चांना सुरूवात झाली आहे.

 

देवधरांच्या पोस्टवर काय म्हणतात नेटकरी?

तब्बल 28 वर्षे भाजपकडे असणाऱ्या कसब्यात पराभव स्वीकारावा लागल्याने पुणे लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार निवडीबाबत भाजपकडून अधिक दक्षता घेतली जात आहे. त्यात देवधर यांनी पुणेरी पगडीतील फोटो पोस्ट करत पुणेरी पगडी ! शोभतेय का ? असा प्रश्न उपस्थित केला आहे. देवधर यांच्या या पोस्टवर अनेक यूजर्सकडून कमेंट केल्या जात आहेत.

देवधर यांच्या पोस्टवर कमेंट करताना एका यूजरने म्हंटले आहे की, अक्च्युअली इतर कुठल्याही पेहरावापेक्षा पुणेरी पगडी तुमचा एक अभिन्न अगंच वाटतंय इतकी ही पगडी, सर तुम्हाला परफेक्ट दिसत असल्याचे म्हटले आहे. तर एका यूजरने पुण्याच्या मातीतल्या माणसाला नक्की शोभते असे मत व्यक्त केले आहे. तर, संतोष नेटके या यूरजरने नाही शोभत काळी टोपी शोभते तुम्हाला अशी कमेंट केली आहे.

 

तर, पुण्याशी फार पूर्वीपासून जवळचे नाते आहे देवधर सरांचे. पुण्याची पगडी म्हणजे बुद्धिमत्तांचे प्रतीक त्यामुळे बुद्धिवंतांची पुणेरी पगडी माननीय श्री सुनील जी देवधर सरांच्या बुद्धिवंत व्यक्तिमत्वाला अचूक साजेशी दिसत असल्याचे मत सीमा लिमये यांनी कमेंट करताना म्हटले आहे.

कोण आहेत सुनील देवधर?
सुनील देवधर हे मुळचे पुण्यातीलच. त्यांचा जन्मही पुण्यातच झाला. लहानपणापासून संघाच्या मुशीत तयार झालेल्या देवधर यांनी तब्बल 12 वर्ष ईशान्य भारतात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक काम केले आहे. यातून त्यांनी ईशान्येतील सर्व राज्यांमध्ये संघ आणि भाजप वाढविण्यासाठी मोठे काम केले. याशिवाय 2014 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांच्याकडे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाराणसी मतदारसंघात संघटनेची आणि बुथ बांधणीची जबाबदारी देण्यात आली होती. त्यानंतर 2018 मध्ये त्रिपुरात डाव्यांच्या 25 वर्षांच्या सत्तेला सुरुंग लावत भाजपला सत्तेत बसवलं होतं.

Tags

follow us