मोठी बातमी : पुणे लोकसभा पोटनिवडणुकीला पूर्णविराम; हायकोर्टाच्या आदेशाला SC ची स्थगिती

पुणे : भाजपचे दिवंगत खासदार गिरीश बापट (Girish Bapat) यांच्या निधनानंतर पोटनिवडणूक घेण्याच्या मुंबई उच्च न्यायालयाच्या (Mumbai High Court) आदेशाला सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) स्थगिती दिली आहे. या आदेशाविरोधात निवडणूक आयोगाने सुप्रीम कोर्टात आव्हान दिले होते.  त्यावर आज (दि.8) सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली त्यानंतर हा निर्णय देण्यात आला आहे. त्यामुळे गेल्या काही दिवासांपासून सुरू असलेल्या […]

Letsupp Image   2024 01 08T125910.228

Letsupp Image 2024 01 08T125910.228

पुणे : भाजपचे दिवंगत खासदार गिरीश बापट (Girish Bapat) यांच्या निधनानंतर पोटनिवडणूक घेण्याच्या मुंबई उच्च न्यायालयाच्या (Mumbai High Court) आदेशाला सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) स्थगिती दिली आहे. या आदेशाविरोधात निवडणूक आयोगाने सुप्रीम कोर्टात आव्हान दिले होते.  त्यावर आज (दि.8) सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली त्यानंतर हा निर्णय देण्यात आला आहे. त्यामुळे गेल्या काही दिवासांपासून सुरू असलेल्या पुणे पोटनिवडणुकांच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. या आदेशाला निवडणूक आयोगाकडून सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. (Supreme Court Stays On Pune by Poll Election) 

काही दिवसांपूर्वी  खासदार गिरीश बापट (Girish Bapat) यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या पुणे लोकसभा मतदारसंघात (Pune By poll Election) लवकरात लवकर पोटनिवडणूक घ्या, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने केंद्रीय निवडणूक आयोगाला दिले होते. या सुनावणीवेळी 10 महिन्यांत निवडणूक आयोगाने काहीच का केले नाही? असा सवाल केला होता. तसेच एखादा मतदारसंघ इतके दिवस रिक्त ठेवण योग्य नसल्याचे निरीक्षण नोंदवत आयोगाला लवकरात लवकर कार्यवाही करण्याचे आदेश दिले होते. न्यायालयाच्या या आदेशानंतर पुण्यात लवकरच पोटनिवडणूक होऊ शकते अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. मात्र, आज सर्वोच्च न्यायालयाने हायकोर्टाच्या निर्णयाला स्थिगिती दिली आहे.

मोठी बातमी : बिल्किस बानो प्रकरणात SC चा गुजरात सरकारला झटका; 11 दोषींच्या सुटकेचा आदेश रद्द

काय म्हणाले सुप्रीम कोर्ट?

मुंबई उच्च न्यायालयाने काही दिवसांपूर्वी रिक्त असलेल्या पुण्यात पोट निवडणूक घेण्याचे आदेश देण्यात आले होते. या आदेशाविरोधात निवडणूक आयोगाने सुप्रीम आव्हान देणारी याचिका दाखल केली होती. त्यावर आज न्यायालयाने सार्वत्रिक निवडणुकीला काही दिवसांचा वेळ बाकी असल्याचे म्हणत या पोट निवडणुकांना स्थगिती देत असल्याचे म्हटले आहे. पोटनिवडणुकांबाबत कायद्याची स्पष्टता करू असेही निकाल देताना सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे.  या संदर्भातील पुढील सुनावणी सात आठवड्यांनी होणार आहे.

Exit mobile version