Pune Lok Sabha : पुणे लोकसभेचा उमेदवार ठरला? बावनकुळेंनी स्पष्ट सांगूनच टाकलं

Pune Lok Sabha : पुणे लोकसभेचा उमेदवार ठरला? बावनकुळेंनी स्पष्ट सांगूनच टाकलं

Pune Lok Sabha : राज्यात आता लोकसभा निवडणुकांचे वारे वाहू लागले आहेत. राजकीय पक्षांकडून मोर्चेबांधणी (Lok Sabha Election 2024) केली जात आहे. जागावाटपाच्या चर्चाही सुरू झाल्या आहेत. कोणता मतदारसंघ कुणाला याबाबत अजून अंतिम निर्णय झालेला नाही. मात्र तरीही दबावाचे राजकारण सुरू झाले आहे. पुणे लोकसभेच्या (Pune Lok Sabha) जागेवरूनही रस्सीखेच सुरू आहे. याबाबत अद्याप काहीच निर्णय झालेला नाही. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनीही पुण्यातील उमेदवारीबाबत अत्यंत सावध उत्तर दिले. बावनकुळे आज पुण्यात होते. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. पुणे लोकसभेचा उमेदवार ठरला का?, असा प्रश्न पत्रकारांनी त्यांना विचारला. यावर बावनकुळेंनी केंद्रीय संसदीय बोर्डाकडे बोट दाखवले.

बावनकुळे म्हणाले, आज मी राज्यातील 46 व्या लोकसभा मतदारसंघात आलो आहे. साडेतीन लाख घर चलो अभियान राबवण्याची आमची योजना आहे. पुणे लोकसभा 51 टक्के मते घेऊन महायुती जिंकेल. मोठा विजय होईल. मी याआधीही अनेक वेळा सांगितलं आहे की उमेदवार ठरवण्याचा अधिकार राज्यात कुणालाही नाही. तो अधिकार केंद्रीय संसदीय बोर्डाला आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या समन्वयाने केंद्रीय बोर्ड याबाबत निर्णय घेईल. महायुतीच्या बैठकीत ठरलं की 14 जानेवारीला प्रत्येक जिल्ह्यात मेळावे होणार आहेत. फेब्रुवारीतही मेळावे होतील, असे बावनकुळे म्हणाले.

Pune Loksabha : तुम्ही पक्षाचे धक्कातंत्र पाहिले आहे ना ? सुनील देवधरांनी पुण्यात शड्डू ठोकला !

बच्चू कडूंनी जाहीर बोलण्यापेक्षा बैठकीत बोलावे 

आमदार बच्चू कडूंच्या नाराजीवरही त्यांनी भाष्य केले. ज्या जागावाटपाची अजून चर्चाच नाही. तरी देखील सार्वजनिकरित्या प्रसारमाध्यमांसमोर वक्तव्य करण्यापेक्षा बैठकीत त्यांनी बोलावे. त्यांची मागणी काय आहे ते सांगावे. कालच्या बैठकीलाही ते उपस्थित नव्हते. त्यामुळे कडूंची किती जागांची मागणी आहे हे अजून आम्हाला माहिती नाही.

मारहाणीची घटना गंभीर, कांबळेंशी बोलणार 

भाजप आमदार सुनील कांबळे यांनी पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण केल्याचे प्रकरण गंभीर आहे. लोकप्रतिनिधींनी संयमाने वागले पाहिजे. असे कृत्य करू नये. या घटनेची गंभीर दखल आम्ही घेऊ. घटना गंभीर आहे. पण या घटनेची पोलीस चौकशी करत आहेतच शिवाय पक्षाकडूनही नक्कीच चौकशी करू असे बावनकुळे म्हणाले. मात्र आमदार सुनील कांबळेंशी मी बोलणार आहे. त्यांची बाजूही ऐकून घेणे महत्वाचे आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Pune Loksabha : माझं पुण्यावर प्रेम पण, लोकसभा निवडणूक.. फडणवीसांचं वक्तव्य अन् पिक्चर क्लिअर!

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज