Supriya Sule : राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे ( Supriya Sule ) यांनी राज्य सरकारकडून बारामती मध्ये घेण्यात आलेल्या नमो रोजगार मेळाव्यावर जोरदार निशाणा साधला. कार्यक्रमावर पाच कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला. मात्र 43 हजारांचा आश्वासन देऊन दहा हजारच नोकऱ्या देण्यात आल्या. त्यामुळे सरकारचा हा जुमला होता. असं पुढे म्हणाल्या.
‘सत्तेत आल्यानंतर बेकायदेशीर स्थलांतरीतांना बाहेर काढणार’; डोनाल्ड ट्रम्प यांचा इशारा
सुप्रिया सुळे या माध्यमांशी बोलत होत्या त्यावेळी त्यांनी राज्य सरकारच्या बारामतीमध्ये घेण्यात आलेल्या नमो रोजगार मेळाव्यावर टीका केली. सुळे म्हणाल्या की, बारामतीतील नमो रोजगार मेळाव्यावर पाच कोटी रुपये खर्च करण्यात आल्याचं वर्तमानपत्रात वाचलं. त्याचबरोबर या मेळाव्यात 43 हजार नोकऱ्या देण्यात येणार होत्या. मात्र प्रत्यक्षात दहा हजारच नोकऱ्या देण्यात आल्या. त्यादेखील कायमस्वरूपीच्या नसल्याचं बोलले जात आहे. त्यामुळे 33 हजार नोकऱ्या गेल्या कुठे? मग हा जुमला नाही का? असा सवाल सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केला आहे.
Sonu Sood च्या ‘फतेह’ चा बहुप्रतिक्षित टीझर प्रदर्शित; चाहत्यांची उत्कंठा वाढली
दोन मार्च रोजी राज्य सरकारचा नमो रोजगार मेळावा ( Baramati Namo Great job fair ) हा कार्यक्रम बारामतीत पार पडला. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसह मंत्रिमंडळातील मंत्री या कार्यक्रमासाठी उपस्थित होते. या मेळाव्यातून सुमारे ४३,००० लोकांना रोजगार मिळेल असे सांगितले होते.
यादरम्यान आम आदमी पक्षाचे नेते विजय कुंभार यांनी फेसबुक पोस्ट करत पोलखोल केली होती. ते म्हणाले होते की, बारामतीमधील नमो महारोजगार मेळाव्याच्या सुरस आणि चमत्कारिक कहाण्या आता पुढे येऊ लागल्या आहेत.या मेळाव्यातून सुमारे ४३,००० लोकांना रोजगार मिळेल असे सांगीतले जात होते. मात्र प्रत्यक्षात वस्तुस्थिती वेगळीच आहे रिक्त जागांचा तक्ता पाहिला तर यातील जवळपास ३०,००० (तीस हजार) जागा या नोकऱ्या नसून ट्रेनी पदे आहे.