Download App

सुप्रिया सुळेंच्या सासू अॅनी सुळे यांचं निधन; पोस्ट करत म्हणाल्या की…

Supriya Sule यांच्या सासुबाई अॅनी सुळे यांचे निधन झालं आहे. याबाबत स्वतः सुप्रिया सुळे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत माहिती दिली.

Supriya Sule’s mother-in-law Annie Sule passes away : राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या सासुबाई अॅनी सुळे यांचे निधन झालं आहे. याबाबत स्वतः सुप्रिया सुळे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत माहिती दिली. या पोस्टमध्ये सुप्रिया सुळे म्हणाल्या की, माझ्या सासू अॅनी सुळे या आम्हाला काल सोडून गेल्या. त्या खंबीर कणखर आणि प्रतिष्ठित महिला होत्या. आम्हाला त्यांची खूप आठवण येईल.

अॅप्पलच्या चाहत्यांना ट्रम्पकडून दिलासा! टेक्नॉलॉजी प्रोडक्ट्सवर करातून दिली सूट

त्यांच्याप्रती अशोक व्यक्त करणाऱ्या प्रत्येकाचे मी आभार मानते. .सुप्रिया सुळे यांनी केलेल्या पोस्टवर अनेकांनी श्रद्धांजली अर्पण केले आहेत. त्यांना नुकतेच सुप्रिया सुळे यांच्या काकी भारती पवार यांचे देखील दोन आठवड्यांपूर्वी निधन झालं या दुःखातून त्या सावरत असतानाच आता पुन्हा सासूबाईच्या निधनाने सुप्रिया सुळे यांना शोक झाला आहे.

Murshidabad Violence : ‘वक्फ’ वरुन पश्चिम बंगालमध्ये राडा; 3 जणांचा मृत्यू, 110 जणांना अटक

प्रतापराव पवार यांच्या पत्नी भारती पवार यांचं निधन (Bharati Pawar) झालंय. भारती पवार मागील काही दिवसांपासून आजारी होत्या. भारती प्रतापराव पवार (वय 77 वर्षे) यांचे आज सायंकाळी दीर्घआजाराने निधन झालंय. ‘सकाळ’चे अध्यक्ष प्रतापराव पवार यांच्या त्या पत्नी होत. त्यांच्यामागे मुलगा ‘सकाळ’चे व्यवस्थापकीय संचालक (Pune) अभिजित पवार, सून मृणाल, नातवंडे जान्हवी आणि राहुल तसेच मुलगी अश्विनी, नातू झाकीर असा परिवार आहे.

काका-पुतण्यात गोडवा; राष्ट्रवादीत काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र येतील का ?

भारती पवार या गेल्या सहा महिन्यांपासून आजारी होत्या. त्या पूर्वाश्रमीच्या भारती श्रीपतराव पाटील होत. मूळच्या मुंबईतील असलेल्या भारती (Bharati Pawar passed away) यांचे बालपण शिवाजी पार्क परिसरात गेले. त्यांचे शालेय शिक्षण तेथील बालमोहन विद्या मंदिरात झाले. रुईया महाविद्यालयातून त्यांनी कला शाखेची पदवी घेतली. चित्रकलेत त्यांचा हातखंडा असल्यामुळे पुढे त्यात त्यांनी पदव्युत्तर पदवी घेतली. त्यानंतर 22 ऑगस्ट 1970 रोजी त्यांचा प्रतापराव पवार यांच्याशी विवाह झाला.

follow us