अॅप्पलच्या चाहत्यांना ट्रम्पकडून दिलासा! टेक्नॉलॉजी प्रोडक्ट्सवर करातून दिली सूट

अॅप्पलच्या चाहत्यांना ट्रम्पकडून दिलासा!  टेक्नॉलॉजी प्रोडक्ट्सवर करातून दिली सूट

Trump offers relief to Apple fans! Tax exemption on technology products: अॅप्पल च्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. कारण नुकताच तरी त्यांच्या आवडीच्या आयफोनच्या किंमती वाढणार नाहीत. गेल्या काही आठवड्यांपूर्वी अमेरिका आणि चीनच्या टॅरिफ वॉरमध्ये अॅप्पल कंपनीच्या प्रॉडक्टच्या किंमती वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. जर या किंमती वाढल्या असत्या तर अॅप्पलच्या प्रॉडक्ट्सवर 145 टक्के असा भक्कम टॅक्स लागला असता.

Murshidabad Violence : ‘वक्फ’ वरुन पश्चिम बंगालमध्ये राडा; 3 जणांचा मृत्यू, 110 जणांना अटक

डोनाल्ड ट्रम्प यांच्या सरकारने स्मार्टफोन्स, लॅपटॉप आणि इतर टेक्नॉलॉजी प्रोडक्ट्सवर करातून सूट दिली आहे. त्यामुळे केवळ अॅप्पलच्या ग्राहकांसाठी नाही तर जगभरातील टेक्नॉलॉजी प्रोडक्ट्स खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी हा दिलासा असणार आहे. तसेच अमेरिकेमध्ये बनणाऱ्या या प्रॉडक्ट्समध्ये लागणाऱ्या विविध चिप्स आणि मॅन्युफॅक्चरिंग युनिट हे बाहेरील देशातून आयात करावे लागतात त्यामुळे या गोष्टी महाग असतात. तसेच ट्रम्प यांनी दिलेल्या कर सवलतीमध्ये सेमीकंडक्टर बनवणाऱ्या मशीन आणि चीफ इंडस्ट्रीसाठी दिलासादायक गोष्ट आहे.

काका-पुतण्यात गोडवा; राष्ट्रवादीत काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र येतील का ?

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रेसिप्रोकल टॅरिफच्या आदेशाला तीन महिन्यांची स्थगिती दिली आहे. या निर्णयामुळे जगातील 75 पेक्षा जास्त देशांना दिलासा मिळाला आहे. मात्र चीनची यातून सुटका झालेली नाही. अमेरिकेने चीनवर 145 टक्के टॅरिफ लादला आहे. याला उत्तर म्हणून चीननेही अमेरिकेच्या उत्पादनांवर 125 टक्के कर आकारण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, यानंतर चीनने आणखी एक चाल खेळली आहे. कावेबाज चीनकडून आता शांततेच्या बाता सुरू झाल्या आहेत. चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांनी शुक्रवारी युरोपीय संघाला (ईयू) अमेरिकेच्या धाक धमकीचा एकत्रित विरोध करण्याचे आवाहन केले.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube