Download App

हॉस्पिटलची बिलं अन् 60 रूपयांची गोळी 6 हजारांना; मंगेशकर रुग्णालय प्रकरणी सुरेश धस संतापले

Suresh Dhas on Deenanath Mangeshkar Hospital for Tanisha Bhise case : विधान परिषदेचे आमदार अमित गोरखे यांचे स्विय सहाय्यक सुशांत भिसे यांच्या पत्नी तनिषा भिसे (Tanisha Bhise) यांचा पैशांअभावी उपचार केले नसल्याचा आरोप भिसे कुटुंबियांनी दिनानाथ रूग्णालय (Deenanath Mangeshkar Hospital) प्रशासनावर केला होता. त्यानंतर मोठा राडा पाहण्यास मिळाला. यानंतर आता या प्रकरणावर भाजप आमदार सुरेश धस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

काय म्हणाले सुरेश धस?

हॉस्पिटलची बिल प्रमाणाच्या बाहेर आकारली जात आहेत. हा मुद्दा मी गेल्या काही दिवसांपूर्वीच सभागृहात उपस्थित केला होता. त्यानंतर आता आमच्याच पक्षाचे आमदार अमित गोरखे यांच्या पीएच्या बाबतीत ही घटना घडल्यानंतर हा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. मात्र आता स्वत: मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणात दखल घेतली आहे.

भक्तिमय वातावरणात पार पडला ‘संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई’ चा नेत्रदीपक लघुदर्शन सोहळा

त्यावर पुढच्या 4-5 दिवसांत स्वतंत्र समिती नेमून सर्व रूग्णालयांची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच मी मेडीकलचा मुद्दा दाखील उपस्थित केला होता. कारण 60 रूपयांची गोळी जर 6 हजारांना मिळत असेल तर गरिब लोकांनी आजारी पडावं की, नाही. आमचे योगेश सागर नावाचे आमदार आहेत. त्यांचे 3-4 हॉस्पिटल आहेत. त्यांना हे सांगितलं होतं की, रूग्णापर्यंत जाईपर्यंत 60 रूपयांची गोळी 6 हजारांना मिळते. तसेच रूग्णालयांच्या नातेवाईतकांचेच मेडीकल कसे काय असतात. हा मुद्दा देखील उपस्थित केला होता. तसेच ठराविक डॉक्टर ठराविक कंपन्यांचेच मेडिसिन्स का प्रेफर करता हावर देखील या समितीने उहापोह करावा.

‘लव फिल्म्स’चा ‘देवमाणूस’ आणि ‘वध’ च नातं काय…? 25 एप्रिलला चित्रपट होणार रिलीज

तसेच दीड लाखांचा दवाखाना आणि पावणे दोन लाखांचे मेडिकल बिल होते. हा प्रकार फार भयावह आहे. याचा तपास तसेच हे रूग्णालये मुख्यमंत्री सहायता निधी कक्षाचे फोन का उचलत नाहीत? यांची एवढी मुजोरी कशी याचा तपास केला जावा. तसेच मी देखील या कक्षात काम पाहतो. माझ्यासह इतर मतदारसंघात मी या कक्षातून मदत पुरवण्याचा प्रयत्न करतो. मात्र जेव्हा 5 डॉक्टरांना फोन केला जातो. तेव्हा एक जण हो म्हणतो. त्यामुळे आमचा देखईल अवमानच होतो. मात्र कालची घटना आमच्याच आमदाराच्या पीएच्या बाबातील घडणं हे भयावह आहे. असंही यावेळी धस म्हणाले.

follow us