Download App

Maharashtra Politics : ‘शेवटी बाळासाहेब काय बोलले ते विसरलात का ? सुषमा अंधारे यांची खोचक टीका

पुणे : केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह हे एकनाथ शिंदे गटाला दिल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली. गेल्या काही महिन्यांपासून शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह कुणाचं याचा संघर्ष सुरू होता. यातच निवडणूक आयोगात (Election Commission) सुनावणी पूर्ण झाल्यावर निकाल राखून ठेवण्यात आला होता. शिवसेना नाव आणि चिन्ह शिंदे गटाला मिळाल्यामुळे ठाकरे गटाला हा मोठा धक्का मानला जात आहे. यावरूनच ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे ( Suhsma Andhare ) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्यासह भाजपवर जोरदार हल्लाबोल केला.

सुषमा अंधारे म्हणाल्या, निवडणूक आयोगाचा कालचा निकाल महाराष्ट्रातील कोणालाच पटलेला नाही. तथ्यांच्या आधारावर निवडणूक आयोगाने निर्णय घेणे अपेक्षित होतं अशी नाराजी त्यांनी यावेळी व्यक्त केली. तथ्यांच्या आधारावर जेव्हा कागदपत्र सादर करायला सांगण्यात आली होती, तेव्हा जर शिंदे गटाची एकूण कागदपत्र ४ लाख सादर झाली असतील. तर त्याच वेळेला आम्ही २२ लाख डॉक्युमेंट सादर केले होते. खरे म्हणजे जे बंडखोर लोक गेले आहेत, ते लोक मूळ शिवसेनेतून निवडून आले आहेत. एकनाथ शिंदे यांनी सांगितलं की मिरीटवर निकाल लागला पाहिजे, तर मुळात एकनाथ शिंदे किंवा त्यांच्या साथीदारांनी मेरिट कधीच सिद्ध केलं, असा सवाल सुषमा अंधारे यांनी उपस्थित केला.

स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये प्रशासक आहेत, हे प्रशासक निवडणुकीला सामोरे का जात नाहीत ? तरी ईडी आणि सीबीआय सारख्या स्वायत्त यंत्रणेला कामाला लावण्यात आले आहे तर आता निवडणूक आयोगालाही कामाला लावलं असलयाचे यावेळी त्या म्हणाल्या. जर या पद्धतीने भाजपा निर्णय घेत असेल आणि हा निर्णय घेताना एकनाथ शिंदेचा कळसूत्री बाहुलीसारखा वापर करून घेत असेल तर हे एकनाथ शिंदे यांनी ठरवलं पाहिजे की, आपण असे वागावे का ? अशी जोरदार टीका सुषमा अंधारे यांनी केली.

उद्धव ठाकरेंना निवडणूक आयोगाचा आणखी एक झटका.. कसबा-चिंचवड निवडणुकीपुरतीच राहणार मशाल !

एकनाथ शिंदे कधीकधी असे आरशात उभे राहून बोलतात, असं मला वाटतं कारण शिंदेंना एवढे सगळे अधिकार शिवसेनेकडे असताना होते, म्हणजे मंत्री असताना होते, ते एकनाथ शिंदे आता मुख्यमंत्री राहून देखील देवेंद्र फडणवीस यांना विचारता कोणताही निर्णय घेऊ शकत नाहीत. त्यांच्या मनाप्रमाणे मंत्रिमंडळ विस्तार देखील साधा करता आला नाही. मनाप्रमाणे जर ते खरंच महाराष्ट्र आणि शिवसेना आणि धनुष्यबाण याची अस्मिता शाबूत राखण्यासाठी काम करत असतील, तर राज्यपाल कोषारीच्या राजीनामाच्या ऐवजी त्यांची हकालपट्टी करण्यासाठी त्यांनी केंद्राकडे मागणी केली असती. पण ते यावर एक शब्द देखील कधी बोलले नाही.

कर्नाटकला गाव जोडतानाचा जेव्हा निर्णय चालू होता, त्यावेळेस देखील त्यांनी जोपर्यंत केंद्र सरकारचा निर्णय मिळत नाही, तोपर्यंत एकनाथ शिंदे यांनी आपल्या तोंडातून एक शब्द देखील काढले नाहीत. उलट बोम्मईच्या आक्रमकपणाला नंतरच्या काळात देवेंद्र फडणवीस काहीसे सामोरे आले, परंतु मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी हिम्मत दाखवली नाही, याचा अर्थ असे की, एकनाथ शिंदेंनी धनुष्यबाण हा देवेंद्र फडणवीस आणि टीम भाजपाकडे गहाण ठेवला आहे. शिवसेना नाव आणि चिन्ह मिळाल्यावर जे सेलिब्रेशन होतं ते दुसऱ्याच्या लग्नामध्ये बुंदी लाडू वाटल्यासारखं सेलिब्रेशन होतं अशी खोचक टीका सुषमा अंधारे यांनी केली.

Tags

follow us