पुणे : दिव्यांग आणि मुकबधीर विद्यार्थ्यांसाठी येत्या 17 फेब्रवारी रोजी जलतरण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या वर्षी हा उपक्रम पुण्यातील बालकल्याण संस्थेच्या सहकार्याने आयोजित करण्यात आला आहे. या स्पर्धेसाठी देसाई बदर्स लि. आणि लायन्स क्लब सहकार नगर यांच्याकडून विशेष पुढाकार घेण्यात आला आहे. गेल्या 28 वर्षांपासून अशा स्वरूपाच्या स्पर्धेचे आयोजन केले जात आहे. (Lions Club & Desai Brothers Organized Swimming Competition For Special Child)
मोठी बातमी : निवडणुकीपूर्वीच मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटणार; 20 फेब्रुवारीला विशेष अधिवेशन
यावर्षी ही स्पर्धा शनिवार (दि. 17 फेब्रुवारी ) रोजी सकाळी 11 वाजता जंगली महाराज रस्त्यावरील बालगंधर्व रंगमंदिराजवळ असलेल्या ना. ग. नांदे जलतरण तलाव येथे संपन्न होणार आहे. यंदाच्या स्पर्धेसाठी पुणे, अहमदनगर, नारायणगाव, भोर आदी भागातून 170 राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय जलतरणपटू या स्पर्धेमध्ये भाग घेणार आहेत.
लेकीचे युक्रेनमध्ये निधन, 12 दिवसांनी आईला अंत्यदर्शन, फडणवीसांच्या संवेदनशीलतेची ‘प्रचिती’
वरील स्पर्धकांशिवाय या स्पर्धेत सीआर रंगनाथन, व्हीआर रुईया स्कूल, दिलासा, कामायनी पॅराप्लॅगिक होम, क्वीन्स मेरी टेक्निकल स्कूल, भोसरी ब्लाइंड स्कूल, आळंदी ब्लाईंड स्कूल, कोरेगांव ब्लाइंड स्कूल, कोथरुड ब्लाइंड स्कूल इत्यादी अनेक संस्था आणि शाळांचे विद्यार्थी या स्पर्धेत सहभाग घेणार असून, स्पर्धेचे उद्घाटन लायन्स प्रांत 3234 डी-2 चे माजी प्रांतपाल लायन अरुण शेट यांच्या शुभहस्ते करण्यात येणार आहे.
राम मंदिर ते अशोक चव्हाण : ‘या’ चार कारणांमुळे लोकसभा अन् विधानसभा एकत्रच होणार?
या उपक्रमातून दिव्यांग विद्यार्थ्यांना व त्यांच्या पालकांना तसेच समाजालादेखील प्रेरणा, स्फूर्ती मिळत असते. त्यामुळे या स्पर्धेस मोठ्या संख्येने उपस्थित राहून स्पर्धकांना प्रोत्साहन देण्याचे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे. स्पर्धेचा समारोप व पारितोषिक वितरण समारंभ दुपारी 1 वाजता, देसाई ब्रदर्स लि. चे चेअरमन नितीनभाई देसाई यांच्यासह लायन्स प्रांत 3234 डी- 2 चे माजी प्रांतपाल लायन श्रीकांत सोनी व माजी प्रांतपाल लायन सी. डी. शेट आदी मान्यवरांच्या हस्ते संपन्न होणार आहे.