Tanaji Sawant and Rishiraj Sawant:माजी मंत्री आणि शिवसेना नेते तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांचा मुलगा ऋषिराज सावंत ( Rishiraj Sawant) यांचं पुणे विमानतळावरून अपहरण झाल्याचा गुन्हा नोंदविण्यात आला होता. त्यामुळे मोठी खळबळ उडाली होती. पोलिस यंत्रणेने तपास करत आता ऋषिराज सावंत व त्याचे दोन मित्र यांना शोधून काढले आहे. या तिघांनाही चेन्नई विमानतळावरून पुण्याला आणण्यात आले आहे. हे तिघेही विमानने बकाँकला जात होते. नेमकी अपहरणचा तक्रार कुणी केली आहे. या बेपत्ता होण्याचे खरे कारण शोधणार असल्याची माहिती पुण्याचे पोलीस उपायुक्त रंजनकुमार शर्मा यांनी पत्रकार परिषदेत दिली. त्या पत्रकार परिषदेला तानाजी सावंत हेही उपस्थित होते.