वेळू गावच्या विक्रम शिंदेंचा तंजावर साहित्य संमेलनात विशेष सन्मान

Sarfojiraje Marathi Sahitya Sammelan;दक्षिण भारतातील पहिले मराठी साहित्य संमेलन यशस्वी केल्याबद्दल तंजावर संस्थानच्या वतीने विशेष गौरव.

Sarfojiraje Marathi Sahitya Sammelan

Sarfojiraje Marathi Sahitya Sammelan

Sarfojiraje Marathi Sahitya Sammelan: रहिमतपूर (कोरेगाव): अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद आयोजित सरफोजीराजे (द्वितीय) मराठी साहित्य संमेलन तंजावर – तामिळनाडू येथे नुकेतच उत्साहात संपन्न झाले. सव्वातीनशे वर्षांनंतर दक्षिण भारतात पहिल्यांदाच मराठी साहित्य संमेलन घेण्यात आले. या संमेलनाच्या आयोजन समितीत उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस, वेळू गावचे सुपूत्र कवी विक्रम मालन आप्पासो शिंदे यांचा तंजावर संस्थानचे प्रमुख श्रीमंत छत्रपती बाबाजीराजे भोसले व श्रीमंत युवराज संभाजीराजे भोसले यांच्या हस्ते विशेष सन्मान करण्यात आला.

ज्ञानेश कुमारांचं 20 वर्षांपूर्वीची फाईल उघडली; भ्रष्टाचार, गुन्हेगारी गैरवर्तनाचे आरोप, केरळ सरकारकडून चौकशीचे आदेश

यावेळी अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष व तंजावर साहित्य संमेलनाध्यक्ष डॉ. शरद गोरे, माजी शिक्षण मंत्री डॉ. लक्ष्मणराव ढोबळे, श्रीमंत छत्रपती आबाजीराजे भोसले, साहित्य परिषदेच्या उपाध्यक्षा शुभांगीताई काळभोर, विकास भोसले, रवींद्र पाटील, कवी रमेश रेडेकर आदी उपस्थित होते.

‘अजितदादांचं नाव कसं सोडणार?’; सुनेत्रा पवारांच्या आव्हानाला पुरुषोत्तम जगतापांचं सणसणीत प्रत्युत्तर

या संमेलनासाठी महाराष्ट्रातून आणि देशभरातून शेकडो मराठी साहित्यिक उपस्थित झाले होते. छत्रपती शिवाजी महाराजांचे बंधू व्यंकोजीराजे भोसले यांनी दक्षिण भारतात तंजावर येथे मराठा साम्राज्याची स्थापना केली. पुढे व्यंकोजींचे वारस सरफोजीराजे (द्वितीय) यांनी मराठी आणि दक्षिणेतील संस्कृतीचा अप्रतिम संगम घडवून आणला. सरफोजीराजे भोसले (द्वितीय) यांनी तंजावर हे दक्षिणेतील मराठी संस्कृतीचे मुख्य केंद्र बनवले. सरफोजीराजेंनी साहित्यिक, सांस्कृतिक आणि सामाजिक विकासात महत्त्वपूर्ण योगदान दिले असल्याने या संमेलनाला सरफोजींचे नाव देण्यात आले होते.

‘हिटलरने स्वतःला गोळी घातली’; तशी वेळ येऊ नये, भाजपने लक्षात ठेवावं, उद्धव ठाकरेंचा इशारा

मराठीचा आणि तंजावरचा अनुबंध पुन्हा जोडला जावा आणि दक्षिणेत अभिजात मराठीचा जागर व्हावा यासाठी हे मराठी साहित्य संमेलन घेण्यात आले होते. या संपूर्ण संमेलनाचे आयोजन, समन्वय, निवेदक, प्रसिद्धी आणि विचारपीठावरील नियोजनात दिलेल्या योगदानाबद्दल विक्रम मालन आप्पासो शिंदे यांना शाल आणि सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले.

Exit mobile version