पुणे : शहरीकरण, पायाभूत सुविधांचा विकास, घरे तसेच व्यावसायिक प्रकल्प विस्तारण्याच्या हेतूने अमलात आणल्या जाणाऱ्या सरकारी उपक्रमांमुळे भारतीय बांधकाम क्षेत्रात दमदार विकास दिसून येतोय. पारंपरिक साहित्यापासून अधिक आधुनिक, पर्यावरणपूरक सुविधा उदा. कोटेड स्टीलसारख्या टिकाऊ आणि कस्टमाइज करता येण्यासारख्या उत्पादनांकडे मोठ्या प्रमाणावर कल वाढलाय. याच हेतून आता टाटा ब्लूस्कोप स्टीलतर्फे (Tata BlueScope Steel) प्रिझ्मा® (PRISMA coated steel ) लॉन्च करण्यात आले.
मंत्री पंकजा मुंडेंनी दिली तक्रार; परळीचा आरोपी पुण्यात अटक, वाचा नक्की काय आहे प्रकरण?
टाटा ब्लूस्कोप स्टीलने प्रिझ्मा® हे अत्याधुनिक, प्री- पेंटेड, अलॉय- कोटेड स्टील लाँच केलंय. नव्या युगाच्या शाश्वत पायाभूत सुविधा आणि औद्योगिक विकासासाठी हे उत्पादन आदर्श आहे. कठोर संशोधन आणि नाविन्यातून तयार करण्यात आलेले प्रिझ्मा® वेगवेगळ्या वातावरणात दीर्घकाळ टिकणारे आणि चांगली कामगिरी करणारे असेल, असा विश्वास टाटा ब्लूस्कोप स्टीलच्या डीजीएम मार्केटिंग आणि कॉर्पोरेट कम्यनिकेशन प्रमुख प्रिया राजेश म्हणाल्या.
“प्रिझ्मा® हे उत्पादन आमच्या भारताच्या पायाभूत सुविधा क्षेत्रातील बदलत्या गरजांनुसार आधुनिक, शाश्वत आणि उच्च दर्जाची स्टील उत्पादने पुरवण्याच्या बांधिलकीशी सुसंगत आहे. टाटा ब्लूस्कोप स्टीलमध्ये आम्ही दर्जेदार उत्पादने पुरवण्यापलीकडे जात मोठी उद्दिष्टे ठेवली. आम्हाला #ShelterForAll च्या माध्यमातून दीर्घकालीन बदल घडवून आणायचे आहेत तसेच भावी पिढ्यांसाठी सुरक्षित आणि जास्त टिकाऊ रूफिंग उत्पादने देण्याचा हेतू आहे,” असे प्रिया राजेश म्हणाल्या.
विशेषतः वेगाने विकसित होत असलेल्या दुसऱ्या आणि तिसऱ्या श्रेणीतील शहरांत ही उत्पादने उपलब्ध करण्यावर कंपनीचा भर असल्याचंही त्यांनी सांगितलं.
दरम्यान, प्रिझ्मा® हे प्री- पेंटेड 55 टक्के एएल- झेडएन अलॉय कोटेड स्टील कॉइल, प्रीमियम, उच्च कामगिरी करणारे उत्पादन कस्टमाइज्ड रूफिंग आणि क्लॅडिंग पर्यायांच्या शोधात असलेल्या ग्राहकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी बनवण्यात आलंय. हे उत्पादन कलर- कोटेड स्टील ऑइल हाय- ग्लॉस फिनिशमुळे चांगले दिसते आणि स्क्रॅच रेसिस्टन्समुळे दीर्घकाळ टिकते.
Shreya Bugde :श्रेया बुगडे श्रीलंकेत करतेय एन्जॉय, पाहा बीचवरील फोटो…
आर्किटेक्ट्स आणि बिल्डर्स यांच्यासाठी प्रिझ्मा®च्या माध्यमातून डिझाइनची लवचिकता, ठळक आणि सौंदर्यपूर्ण डिझाइन्स टिकाऊपणावर तडजोड न करता मिळतात. प्रीमियम अपील, दीर्घकाळ टिकणारी कामगिरी आणि अत्याधुनिक पायाभूत सुविधा उंचावण्याची क्षमता यामुळे हे उत्पादन रूफिंग, क्लॅडिंग, इंटेरियर्स आणि औद्योगिक वापरासाठी आदर्श ठरले आहे.
सौंदर्य आणि टिकाऊपणाबरोबरच प्रिझ्मा® अधिक निरोगी आणि जास्त शाश्वत बांधकाम पद्धतींना चालना देण्यात महत्त्वाची भूमिका बजावते. प्रिझ्मा®च्या लाँचसह टाटा ब्लुस्कोप स्टीलने घातक साहित्याऐवजी अधिक सुरक्षित, पर्यावरण पूरक कोटेड स्टील पर्याय उपलब्ध करून दिला आहे.
भविष्यातही टाटा ब्लूस्कोप स्टील कोटेड स्टील क्षेत्रात नाविन्य आणण्यासाठी बांधील राहील. उत्पादनाची कामगिरी, शाश्वतता टिकवण्यासाठी तसेच सौंदर्य उंचावण्यासाठी संशोधन व विकासाचे काम सुरू आहे. अशी उत्पादने तयार करून भारताच्या पायाभूत सुविधा आणि रियल इस्टेट क्षेत्राची वाढती मागणी पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे.
‘आम्ही आमच्या ग्राहकांचे ते देत असलेल्या अविरत पाठिंब्यासाठी आभारी आहोत. त्यांचा विश्वास आम्हाला नाविन्यपूर्ण आणि सर्वोत्तम उत्पादने तयार करून स्टील उद्योगाच्या भविष्याला चालना देण्यासाठी प्रेरणा देतो,’ असेही प्रिया राजेश म्हणाल्या.
प्रिझ्मा®ची महत्त्वाची वैशिष्ट्ये:
• असामान्य टिकाऊपणा: जबरदस्त ताकद असलेले, वैविध्यपूर्ण वातावरणात दीर्घकाळ टिकणारी कामगिरी देणारे
• कुल कम्फर्ट तंत्रज्ञान: अत्याधुनिक कोटिंग तंत्रज्ञामुळे इंटेरियर अधिक थंड राहाते व उर्जा कार्यक्षमता वाढते
• पारंपरिक साहित्यासाठी शाश्वत पर्याय: अधिक सुरक्षित, पर्यावरणपूरक रूफिंग आणि क्लॅडिंग सुविधा देणारे.
• प्रीमियम आणि कस्टमायझेबल सुविधा: ग्राहकांच्या वैशिष्ट्यपूर्ण गरजा उच्च दर्जासह पूर्ण करण्यासाठी डिझाइन करण्यात आलेले.
• मापदंडाचे पालन: दर्जा व सुरक्षेच्या बाबतीत बीआयएस- मान्यताप्राप्त