Download App

पुरंदरमध्ये शिवतारेंना टेन्शन, राष्ट्रवादीचा दिग्गज नेता करतोय भाजपात प्रवेश

Purandar Former MLA Ashok Tekwade joins BJP : पुरंदरचे माजी आमदार अशोक टेकवडे (Former MLA Ashok Tekwade) हे राष्ट्रवादीला रामराम ठोकून भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. पुरंदर मतदारसंघावर (Purandar Constituency) शिंदे गटाचे माजी मंत्री विजय शिवतारेंकडून (Vijay Shivatare) दावा केला जात आहे. अशावेळी भाजपकडून उमेदवारी मिळणार का? यासह विविध विषयावर पुरंदरचे माजी आमदार अशोक टेकवडे यांनी लेट्सअप मराठीशी संवाद साधला.

राष्ट्रवादी सोडून भाजपात जाण्याचा निर्णय का घेतला? यावर टेकवडे म्हणाले की, माझं मतदारसंघात चांगलं काम असून देखील 2009 साली विधानसभेची उमेदवारी दिली नाही. 2009 ते 2014 पर्यंत माझ्याकडे काहीच दिले नाही. 2014 ला उमेदवारी दिली गेली. त्यामध्ये माझा पराभव झाला होता. काही लोक चुकीचे काम करतात याबाबत मी पक्षाला सांगत होतो. पक्ष संघटनेत काही बदल व्हावेत अशी माझी अपेक्षा होती. पण त्याकडे पक्ष नेतृत्वाने सातत्याने दुर्लक्ष केले. यामध्ये पाच ते सहा वर्षाचा काळ गेला. लोकांचे कामं झाली पाहिजेत म्हणून मी पक्ष सोडण्याच्या निर्णयापर्यत आलो आहे, असे माजी आमदार अशोक टेकवडे यांनी सांगितले.

राष्ट्रवादीने एका प्रादेशिक मंडळावर घेतलं होतं, आमदारकी दिली होती तरी देखील पक्षाकडून अन्याय झाला, असं का वाटतं? यावर माजी आमदार अशोक टेकवडे म्हणाले की माझ्यामध्ये काही आहे म्हणूनच पक्षाने पदं दिली. आमदार झालो तेव्हा 18 ग्रामपंचायतीवर सत्ता होती मी पक्ष वाढीसाठी काम करत 68 ग्रामपंचायतीवर सत्ता मिळवली. जिल्हा परिषद, पंचायत समितीमध्ये राष्ट्रवादीच्या जागा आणल्या. पक्षाने दिले त्यापेक्षा जास्त मी पक्षाला दिले आहे.

शिवराज्याभिषेक दिन अन् वर्धापन दिन एकाच दिवशी; 10 जूनला राष्ट्रवादीचे भव्य शक्ती प्रदर्शन

मतदार संघात अशी चर्चा आहे की साधा ट्रक ड्रायव्हर ते आमदार असा राजकीय प्रवास पवार कुटुंबामुळे झाला पण तेच टेकवडे आता पवार कुटुंबाला सोडून जात आहेत. यावर बोलताना टेकवडे म्हणाले की अशा प्रकारे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल देखील बोलले गेले. त्यावेळी एकनाथ शिंदेंच्या मागे जनता उभा राहिली होती. त्यामुळे अशा चर्चांना काही अर्थ नाही.

भाजप प्रवेशापूर्वी पुरंदरचे माजी आमदार म्हणाले, ‘…तरी अजितदादांना झुकूनच अभिवादन करणार’

भविष्यात भाजप-शिवसेना युती झाली तर पुरंदर मतदार संघावर माजी मंत्री विजय शिवतारे यांचा दावा आहे. अशावेळी तुम्हाला विधानसभेची उमेदवारी कशी मिळेलं? यावर टेकवडे म्हणाले की माझ्यासाठी काहीच ठरवलेलं नाही. 14 वर्ष वनवास सहन केलायं. माझ्यासोबतचे सहकारी दबलेले आहेत त्या सहकाऱ्यांना वेगवेगळ्या ठिकाणी काम करण्याची संधी मिळावी. आपण त्यांना भक्कम करुया. त्यांच्या खांद्यावर जबाबदारी दिल्यानंतर आपल्याला कुठं काही करता येईल का ते तर ठरवूया.

Tags

follow us