Terrible accident at Old Katraj Ghat; Two died on the spot, one seriously injured : गेल्या काही दिवसांपासून राज्यामध्ये अपघातांचं सत्र सुरूच आहे. यामध्ये आता पुण्यातील जुन्या कात्रज घाटात भीषण अपघात झाला. यामध्ये दोघांचा जागीच मृत्यू तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. अपघातानंतर पीएमटी बसचालकास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
नेमकी घटना काय?
आंबेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत आज सकाळी सुमारे 8:40 वाजता जुन्या कात्रज घाटामध्ये भिलारेवाडी वळणाजवळ पीएमटी बस (क्र. MH14/HU/6432) आणि हिरो होंडा पॅशन मोटरसायकल (क्र. MH12/FB/0348) यांचा भीषण अपघात झाला. या अपघातात मोटरसायकलवरील आकाश रामदास गोगावले ( वय ,29, रा. ससेवाडी, भोर) आणि अनुष्का प्रकाश वाडकर ( वय, 27) यांचा जागीच मृत्यू झाला असून नेहा कैलास गोगावले (वय, 20) ही गंभीर जखमी झाली आहे. जखमीवर भारती हॉस्पिटल येथे उपचार सुरू आहेत. दरम्यान, अपघातानंतर पीएमटी बसचालक सुधीर दिलीप कोंडे ( 42, रा. आर्वी, पुणे) यास पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे.
महाराष्ट्राची हास्यजत्राच्या मंचावर घुमणार ‘अगं अगं आई…, ओंकार भोजनेची दणक्यात एन्ट्री
दुसरीकडे पुण्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून गौतमी पाटील राज्यातील राजकारणात चर्चेत आहे. पुण्यातील एका परिसरात तिच्या गाडीचा अपघात झाला असून या अपघातामध्ये तिघेजण जखमी झाले आहे. अपघातात सामील असणारी कार गौतमी पाटीलच्या नावावर असल्याने तिला या प्रकरणात चौकशीसाठी नोटीस देखील पाठवण्यात आली आहे. तर दुसरीकडे गौतमी पाटीलवर देखील कारवाई करण्यात यावी अशी मागणी होताना दिसत आहे. तसेच जेव्हा अपघात झाला तेव्हा गौतमी पाटीलच्या गाडीचा ड्रायव्हरने मद्यपान केलं होता अशी देखील चर्चा सध्या जोराने सुरु आहे.