पुणे : शिवसेना ठाकरे गटाचे पुणे जिल्हाप्रमुख बाळासाहेब चांदेरे यांनी पक्षविरोधी कारवाया केल्याप्रकरणी त्यांची पक्षातून हाकालपट्टी करण्यात आली आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने चांदेरेंवर ही कारवाई करण्यात आल्याची माहिती विभागीय कार्यालयाच्या वतीने देण्यात आली आहे.
दरम्यान, ठाकरे गटातून हकालपट्टी करण्यात आल्यानंतर चांदेरे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत आज संध्याकाळी प्रवेश करणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले आहे. त्यांच्यासोबत काही अन्य पदाधिकारीदेखील प्रवेश करतील, असेही बोलले जात आहे. आगामी लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पाहता ठाकरे गटाला हा मोठा धक्का मानला जात आहे. जिल्ह्यातील भोर, मुळशी, वेल्हे या भागतील अनेक शिवसैनिक ठाकरेंची साथ सोडणार असल्याचंही बोललं जातं आहे.
Maharashtra | Shiv Sena UBT has expelled its Pune District President Balasaheb Chandore from the party for allegedly being involved in anti-party activities.
— ANI (@ANI) April 21, 2023
चांदेरे हे भोर विधानसभा लढण्यासाठी इच्छूक होते. मात्र, महाविकास आघाडीमध्ये भोर मतदारसंघ काँग्रेसकडे असल्याने चांदेरींनी आपली राजकीय सोय बघितली असल्याचंही बोलले जात आहे. चांदेरे यांच्या काम करण्याच्या पद्धतीवर अनेक कट्टर शिवसैनिकांनी याआधी आपली नाराजी बोलून दाखवली होती. मात्र पक्ष नेतृत्वाने त्यावेळी याकडे फारसे लक्ष दिले नव्हतं. मात्र आता पक्षविरोधी कारवाया केल्याचा ठपका ठेवत त्यांची हकालपट्टी करण्यात आली आहे.
याआधी रमेश कोंडे यांनी ठाकरेंची साथ सोडून एकनाथ शिंदे गटात प्रवेश होता. आता चांदेंची ही हकालपट्टी करण्यात आल्याने ठाकरे गटाला हा मोठा धक्का मानला जात आहे. चांदेरेंचा पुरंदर, हवेली आणि भोर या तीन तालुक्यात मोठा जनसंपर्क असल्याने चांदेरे यांच्या रूपाने शिंदे गटाला मात्र फायदा होणार असल्याचे बोललं जात आहे.