पुणे : येत्या 5 मार्चला उद्धव ठाकरे यांची पुण्यातील खेडमध्ये जाहीर सभा होणार आहे. ही सभा पाहून विरोधकांचे डोळे पांढरे झाले पाहिजे, असा खोचक टोला त्यांनी विरोधकांना लगावला आहे.
दरम्यान,पुण्यातील खेडचे राष्ट्रवादीचे आमदार संजय कदम उद्धव ठाकरे गटात प्रवेश करणार आहेत. याचं पार्श्वभूमीवर कदम यांनी आज ठाकरे यांची भेट घेतली. भेटीनंतर उद्धव ठाकरे यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला आहे.
Kasba By Election : रविंद्र धंगेकरांचा प्रचार करणं भोवलं! सहा जणांची पक्षातून हकालपट्टी
ठाकरे म्हणाले, यंदाचा शिमगा असा करा की विरोधक बोंबलत सुटले पाहिजेत. या सभेकडे संपूर्ण देशाचं लक्ष असणार आहे. कारण ही पहिलीच सभा असणार आहे. त्यामुळे प्रत्येकाने काळजी घ्या की मैदान ओसंडून वाहिलं पाहिजे, असंही ते म्हणालेत.
Sanjana Jadhav : 10 वर्षे आमदारकी माझ्यामुळे, दानवेंच्या लेकीचे विधानसभा लढवण्याचे संकेत
उद्धव ठाकरेंच्या भाषणानंतर लगेचच कार्यकर्त्यांकडून ही सभा विक्रमी होणार असल्याचं आश्वासन उद्धव ठाकरे यांनी दिलंय. तसेच पुढे बोलतना ठाकरे म्हणाले, सभेला येणाऱ्या लोकांची आपण जेवणाची सोय करीत नाहीत. लोकं घरुन भाजी भाकरी कांदा घेऊन शिवतीर्थावर आली होती. ही आपली खरी ताकद असून तो कांदा विरोधकांच्या नाकाला ओंदवायचा असल्याचंही ते म्हणालेत.
Alia Bhatt चे लिव्हिंग रूम फोटो व्हायरल; मुंबई पोलीस अॅक्शन मोडमध्ये
येत्या 5 तारखेला खेडमधील गोळीबार मैदानात उद्धव ठाकरेंची जाहीर सभा होणार आहे. आज छोटेखानी झालेल्या सभेदरम्यान, शिवसेना आमच्या हक्काची नाही कोणाच्या बापाची अशा कार्यकर्त्यांकडून घोषणा दिल्या जात होत्या.
दरम्यान, राष्ट्रवादीचे आमदार संजय कदम येत्या दोन दिवसात उद्धव ठाकरे गटात प्रवेश करणार आहेत. तत्पूर्वी आज समर्थकांसह कदम यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यादरम्यान, ठाकरे यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला आहे.