Download App

महिलांनी मारल्याचा अपमान जिव्हारी…! रिक्षा चालकाने खाणीत उडी घेत केली आत्महत्या

  • Written By: Last Updated:

पुणे : धानोरी परिसरात तीन दिवसांपूर्वी एका व्यक्तीने खणीमध्ये उडी मारल्याची घटना घडली होती. मात्र, ही आत्महत्या करणारा व्यक्ती रिक्षा चालक असून त्याने याचं कारण पुढे आला आहे.

अजय शिवाजी टिंगरे (वय 42, रा. धानोरी गाव), असे आत्महत्या केलेल्या रिक्षा चालकाचे नाव आहे. दारू पिऊन घरच्या दारात उभे राहून शिवीगाळ केल्याने शेजाऱ्यांनी घरात शिरून अजय टिंगरे याला मारहाण केली होती. गावात आपल्याला महिलांनी मारहाण केली. त्यामुळे आपला अपमान झाल्याने धानोरी येथील एकाने खाणीत उडी मारून त्याने आत्महत्या केल्याची तपासात निष्पन्न झालं आहे.

मयत अजय टिंगरेच्या पत्नीने विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यानुसार पोलिसांनी नवनाथ हनुमंत टिंगरे याच्यासह अन्य ४ जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अजय टिंगरे हा रिक्षा चालवण्याचे काम करतो. २३ मार्च रोजी रात्री अजय हा दारू पिऊन घरी आला असता तो घरासमोर उभे राहून शिवीगाळ करू लागला. त्याला बायकोला समजावून सांगायला लावले. त्यानंतर अजय हा घरात जाऊन झोपला. मात्र, दुसऱ्या दिवशी सकाळी शेजारचे जबरदस्तीने त्याच्या घरात शिरले, तो झोपेत असतानाचा त्याला मारत घराबाहेर घेऊन आले. अजयच्या बायकोने त्यांना मारू नका, अशी विनवणी केली. मात्र, ते त्याला मारत राहिले यावेळी नागरिकांनी जमायला सुरुवात केल्यावर ते निघून गेले.

Gopichand Padalkar : पवार हे महाराष्ट्राला लागलेली कीड; पडळकरांची जहरी टीका 

त्यानंतर अजय हा गाडी घेऊन घराबाहेर पडला. त्याचे मागोमाग मुलगी आणि सोमा गेरंम देखील त्यांच्या मागे बाहेर पडले. मात्र, त्याच्या डोक्यात गावात महिलांनी मारहाण केल्याचा राग होता. त्या रागाच्या भरात त्याने विश्रांतवाडी धानोरी रस्त्यावरील खाणीत उडी मारली आणि आपली आयुष्य संपवलं. याप्रकरणी आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहेत.

Tags

follow us