Download App

पुनीत बालन ग्रुप आयोजित 35 मंडळांच्या दहीहंडीचा थरार पुणेकरांनी अनुभवला ! ‘शिवतेज’ला दहीहंडी फोडण्याचा बहुमान

बालन म्हणाले, राजकीय लोकांना, पक्षांना एकत्र आणणे खूप सोपे आहे. गणेश मंडळांना एकत्र आणणे हे सर्वात अवघड आहे.

  • Written By: Last Updated:

पुणे: गोविंदा रे गोपाळाचा जयघोष…ढोल ताशांचा मंगलमय गजर…आकर्षक विद्युत रोषणाई… डीजेने वाजविलेले आकर्षक संगीत आणि त्यावर थिरकनाऱ्या तरुणाईचा उसळलेला जनसागर अशा उत्साही वातावरणात पुनीत बालन ग्रुप (Punit Balan Group) आयोजित 35 सार्वजनिक मंडळांची संयुक्त दहीहंडीचा थरार पुणेकरांनी अनुभवलाय. ऐतिहासिक लाल महाल चौकात तुडुंब गर्दीसमोर शिवतेज दहीहंडी संघाने सात थर रचत ही संयुक्त दहीहंडी फोडण्याचा बहुमान मिळवला.

आनंदाची बातमी! राज्यातील मंतैय्या बेडके आणि सागर बगाडेंना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार जाहीर

शहरातील चौक चौकात होणार्‍या दहिहंडी कार्यक्रमांमुळे होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी आणि सुरक्षा व्यवस्थेमुळे पोलिस यंत्रणेवरील ताण कमी करण्यासाठी युवा उद्योजक पुनीत बालन (Punit Balan) यांनी पुढाकार घेऊन संयुक्त दहिहंडी कार्यक्रम घेण्याचा निर्णय घेतला होता. 35 सार्वजनिक गणेश मंडळांनी या उपक्रमाला पाठिंबा देत या संयुक्त दहीहंडीत सहभाग घेतला. छत्रपती शिवाजी महाराज रस्त्यावर ऐतिहासिक लाल महाल चौकात या दहीहंडीचे आयोजन करण्यात आले होते. चौरंगी पॅंडलमध्ये आकर्षक विद्युत रोषणाईने ही दहिहंडी पुणेकरांचे लक्ष वेधून घेत होती. सायंकाळी चारच्या सुमारास कार्यक्रमाला सुरवात झाली. सुरवातीला समर्थ, नादब्रम्ह, शिवमुद्रा, युवा वाद्य पथक या ढोल पथकांनी केलेल्या ढोल-ताशा वादनाने संपूर्ण परिसरात उत्साह भरला. डीजेच्या वादनाला सुरवात झाल्यांनतर उत्साहाला आणखीच उधाण आले. त्यात अधून मधून पावसाच्या सरींची हजेरी आणि देहभान विसरून हजारोंच्या तरुणाईमुळे यामुळे वातावरण जोशपूर्ण झाले होते. महिला आणि तरुणांची संख्याही मोठी होती. या अशा उत्साह पूर्ण वातावरणात वीस गोविंदा पथकांनी सलामी देऊन उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. मुंबईतील चेंबूर येथील तरुणी आणि महिलांच्या पथकाने दिलेली सलामी लक्षवेधक ठरली. रात्री साडेनऊच्या सुमारास कसबा पेठेतील शिवतेज दहीहंडी संघाने सात थर लावत ही पहिली संयुक्त हंडी फोडली. आयोजक पुनीत बालन व अभिनेते प्रवीण तरडे यांच्या हस्ते या संघाला चषक देऊन सन्मानित करण्यात आले. आयोजक पुनीत बालन, माणिकचंद ऑक्सिरीचच्या अध्यक्षा जान्हवी धारीवाल- बालन यांनी उपस्थितांचे स्वागत केले. यावेळी अभिनेता प्रविण तरडे, महाराष्ट्र केसरी सिकंदर शेख यांच्यासह राजकीय, सामाजिक यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी या संयुक्त दहीहंडीला हजेरी लावली.

विधानसभेपूर्वी शिंदे सरकारचा मास्टरस्टोक, आशा स्वयंसेविकांसाठी मोठी घोषणा, मिळणार 10 लाख रुपये


बालन यांचा आता नवासंकल्प

या उपक्रमाबाबत बालन म्हणाले, राजकीय लोकांना, पक्षांना एकत्र आणणे खूप सोपे आहे. गणेश मंडळांना एकत्र आणणे हे सर्वात अवघड आहे. केवळ 35 मंडळे एकत्र आले नाहीतर कार्यकर्ते एकत्र आले आहेत. तेच आजचे सेलिब्रेटी होते. महिलांची पथके येथे सात दिवस, सात थर लावून सलामी देणार आहे. ही पुणेकरांसाठी चांगली गोष्टी आहे. 35 मंडळे 25 मिटर अंतरावर वेगवेगळा दहीहंडी दहीहंडी उत्साह साजरा करायचे. त्याला अर्थ नव्हता. तू मोठा की मी मोठा असे ते समाजायचे. आज समाज परिवर्तन झाले झाले आहे. ही संयुक्त दहीहंडी साजरी करण्यात आली. पुणेकरांना कुठला त्रास नको. ध्वनी प्रदूषण नको, पोलिसांनी त्रास नको, या मागे हतू होता. माझे प्रेम मंडळावर आहे. मंडळांचे प्रेम माझ्यावर आहे. त्यातूनच हे मंडळ एकत्र आले आहे. आज तुम्हाला 35 चा आकडा दिसत आहे. पुढच्या वर्षी 50 सार्वजनिक मंडळे उपक्रमात दिसतील.

follow us