Download App

भावी खासदार जगदीश मुळीक : राष्ट्रवादीने लाजच काढली

पुणे : भाजपचे खासदार तसेच ज्येष्ठ नेते गिरीश बापट यांचे नुकतेच दिवसांपूर्वी निधन झाले होते. त्यांचे निधन होऊन दोन दिवसही उलटले नाही तेच भाजपचे पुणे शहर अध्यक्ष जगदीश मुळीक (Jagdish Mulik) यांचे भावी खासदार म्हणून पोस्टर झळकू लागले आहे. याच पोस्टरवरून आता राष्ट्रवादीने अगदी कडव्या शब्दात मुळीक यांच्यावर टीका केली आहे. जगदीश मुळीक हे बापट साहेबांच्या मृत्यू ची वाट पाहत होते का? असा सवाल राष्ट्रवादी युवक कांग्रेस कार्याध्यक्ष सुरज चव्हाण यांनी केला आहे.

काय म्हंटले आहे ट्विटमध्ये?
भाजपचे पुणे शहर अध्यक्ष जगदीश मुळीक हे बापट साहेबांच्या मृत्यू ची वाट पाहत होते का ? बापट साहेबांच्या आत्म्याला जरा शांती तरी लाभू दयाची होती. त्यांना जाऊन आज तीनच दिवस झाले आहेत, भावी खासदाचे बॅनर पण लावले. जनाची नाही मनाची तरी ठेवा.

दरम्यान भाजपचे ज्येष्ठ नेते गिरीश बापट यांचे काही दिवसांपूर्वी निधन झाले होते. त्यामुळे आता भाजपचे पुणे शहर अध्यक्ष जगदीश मुळीक यांचे भावी खासदार म्हणून पोस्टर पुण्यात झळकू लागले आहे. आता याच मुद्द्यावरून राष्ट्रवादीने भाजपचे पदाधिकारी जगदीश मुळीक यांच्यावर निशाणा साधला आहे.

वाढदिवस साजरा करू नका असे आवाहन करणारे…
माझ्या वाढदिवसदिनी अर्थात १ एप्रिल दरवर्षी आपण मला भरभरून शुभेच्छा देता, विविध समाजपयोगी उपक्रमाचे आयोजन करता. आपल्या या सदिच्छा मला आजवर निश्‍चितच पाठबळ देत आल्या आहेत. त्याबद्दल आपले मनापासून धन्यवाद!

यंदा लोकनेते स्व. गिरीशभाऊ बापट यांच्या निधनामुळे माझा १ एप्रिल, २०२३ रोजी असणारा वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय मी घेतला असून याची सर्वांनी नोंद घ्यावी ! वाढदिवसाचे सर्व कार्यक्रम आणि उपक्रम रद्द करण्यात आले आहेत.

Tags

follow us