Download App

…म्हणून कसब्याची निवडणूकच रद्द करावी! उमेदवाराने केली निवडणूक आयोगाकडे मागणी

  • Written By: Last Updated:

“कसबा पोटनिवणुडकीत होत असलेले पैश्याचे आरोप पाहता कसबा पोटनिवडणूक रद्द करुन ती पुन्हा घेण्यात यावी” अशी मागणी कसबा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार अभिजित बीचुकले यांनी केली आहे. त्यांनी आहे निवडणूक निर्णय अधिकारी यांना तसा अर्ज दिला आहे.

कसबा पेठ पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी भाजपाचे पैसे पोलिसांकडून कार्यकर्ते वाटत आहेत, असा आरोप करून आज सकाळी 10 ते दुपारी 2 वाजेपर्यंत ते उपोषण केलं. त्यानंतर पोलीस उपयुक्तांनी दिलेल्या आश्वासनानंतर त्यांनी आपले उपोषण मागे घेतलं आहे. दरम्यान, आचारसंहितेचा भंग करून धंगेकर पब्लिसिटी स्टंट करत असल्याचा आरोप भाजपकडून करण्यात आला आणि धंगेकरांना सद्बुद्धी द्यावी यासाठी भाजपाच्या कार्यकर्त्यांकडून दगडूशेठ गणपतीला आरती करण्यात आली आहे.

हेही वाचा : रवींद्र धंगेकरांना बुद्धी द्या : भाजपची दगडूशेठ गणपतीला आरती…

अर्जात काय म्हटले आहे ?

काँग्रेसचे उमेदवार यांनी कसबा गणपती समोर केलेले लाक्षणिक उपोषण व त्यांनी प्रशासनासमोर मांडलेले पुरावे पाहता संबंधित लोकांवर करप्ट प्रॅक्टिस अनुषंगाने तात्काळ गुन्हे दाखल करुन ज्या संबंधित उमेदवाराची उमेदवारी रदूदबादल करुन संपुर्ण निवडणूक प्रक्रिया पुन्हा घेणे संबंधी मागणी करत आहे.

मी अपक्ष उमेदवार असून सध्या या मतदार संघातील काँग्रेस पक्षचे उमेदवार यांनी पुराव्यानिशी तक्रार केली की, भाजपचे उमेदवार मत मिळवण्यासाठी लोकांना पैसे वाटप करीत असून त्या संबंधीचे व्हिडीओज सुद्धा सोशल मीडियावर व्हायरल आहेत. इतके पुरावे देऊन काँग्रेसचे उमेदवार आज सकाळी गणपती मंदिर कसाब येथे लाक्षणिक उपोषणाला बसले होते. त्यांना फक्त आश्वासन देण्यात आल्याचे कळले. खरे तर पुरावे व काँग्रेसच्या उमेदवाराने दिलेली सगळी माहिती पाहता प्रशासनाने आरोपींना तात्काळ गुन्हे दाखल करुन ताब्यात घेणे महत्वाचे होते. परंतू असे झालेले दिसत नाही. तरी या संपूर्ण प्रकरणाचा गांभीर्याने विचार करून त्या ठिकाणी निवडणूक निर्णय अधिकारी या नात्याने संबंधीत जे कोणी दोषी उमेदवार असतील त्यांची ताबडतोब आदर्श आचारसंहिता कायदया अंतर्गत उमेदवारी रदूद करुन संपूर्ण निवडणूक प्रक्रियाच पुन्हा घेण्याचे केंद्रीय निवडणूक आयोग यांच्याकडे माझ्या मागणीचा पाठपुरावा करावा.

जोपर्यंत ही मागणी आपण गांभीर्याने घेऊन योग्य तो निर्णय घ्यावा. तसेच गेल्या आठवड्यामध्ये मी संपूर्ण निवडणूक प्रक्रिया ही ईव्हीएम द्वारे न घेता ती मतपत्रिकेवरती घेण्याची मागणी आपणाकडे केली होती. त्या संदर्भांतही आपण कोणतेही उत्तर दिले नाही याचा अर्थ निवडणूक निर्णय अधिकारी हे ही या संपूर्ण भ्रष्ट कारभारामध्ये सहभागी आहेत असेच म्हणावे लागेल. तेव्हा ताबडतोब माझ्या निवेदनाची गांभीर्याने दखल घेत मागणी नुसार निवडणूक प्रक्रिया नव्याने घेण्याचे संदर्भांत निर्णय घ्यावा.

Tags

follow us