NEET पेपरफुटी प्रकरणात तिसरी अटक; पुण्यात ब्युटी पार्लर चालवणारी महिला चौकशीसाठी ताब्यात

NEET paper leak case मध्ये आता सीबीआयने तिसऱ्या व्यक्तीला अटक केली आहे. आता पुण्यातून आणखी एका महिलेला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

NEET Paper Leak Case 1

NEET Paper Leak Case 1

Third arrest in NEET paper leak case! Woman who was transporting students from Pune to the accused detained : देशातील २४ लाख विद्यार्थ्यांचे डॉक्टर होण्याचे स्वप्न धुळीस मिळवणाऱ्या NEET UG 2026 पेपरफुटी प्रकरणाचा तपास आता निर्णायक वळणावर आला आहे. सीबीआयने या प्रकरणाची सूत्रे हाती घेताच महाराष्ट्रातून धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. नाशिकमधून सुरू झालेला हा पेपरफुटीचा वणवा आता थेट पुण्यापर्यंत पोहोचला असून, पुणे पोलिसांनी आज पहाटे एका संशयित महिलेला ताब्यात घेतले आहे.

पुण्यातून महिला संशयित ताब्यात: कोण आहे मनीषा वाघमारे?

पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने आज पहाटे मोठी कारवाई करत मनीषा वाघमारे नावाच्या महिलेला ताब्यात घेतले आहे. प्राथमिक माहितीनुसार, मनीषा पुण्यात एक ब्युटी पार्लर चालवते. मात्र, सौंदर्याच्या व्यवसायाआड ती पेपरफुटीच्या रॅकेटमध्ये सक्रिय असल्याचा संशय आहे. या प्रकरणातील संशयित धनंजय लोखंडे याला मदत करणे आणि गरजू विद्यार्थ्यांना त्याच्यापर्यंत पोहोचवण्याचे काम मनीषा करत होती, असा पोलिसांना संशय आहे. पोलिसांनी तिच्याकडून एक लॅपटॉप आणि मोबाईल जप्त केला आहे. यामध्ये धनंजय लोखंडेसोबत केलेले व्हॉट्सअ‍ॅप कॉल्स आणि संशयास्पद मेसेजेस सापडले आहेत.

धक्कादायक! नदी गायब करून दाखवला नाला; मंत्री पंकजा मुंडेच्या हस्तक्षेपाने थांबलं काम

नेमकं प्रकरण काय?

या पेपरफुटीचा उगम आणि प्रसार नाशिकमधून सुरू झाल्याचे सांगितले जात आहे. या प्रकरणात 30 वर्षीय शुभम खैरनार या संशयित आरोपीला इंदिरानगर भागातून त्याला अटक करण्यात आली आहे. ताब्यात घेण्यात आलं आहे. खैरनार मूळचा नाशिकचा असून तो भोपाळ येथील वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएसचे शिक्षण घेत असल्याचे सांगितले जात आहे.

मोठी बातमी! बारामतीत पुन्हा विमान अपघात; अजितदादांच्या अपघात झालेल्या गावातच कोसळलं

नाशिकमधील लीक प्रश्नपत्रिका हरियाणात पोहोचली, येथे फुटलेल्या पेपरचे 10 सेट तयार करण्यात आले. त्यानंतर, हरियाणातून बिहार, आंध्र प्रदेश, जम्मू आणि काश्मीरपर्यंत नीटची प्रश्नपत्रिका सहजपणे पोहोचली. आत्तापर्यंत हाती आलेल्या माहितीनुसार जयपूरमधून अटक करण्यात आलेला मनीष हाच पेपरफुटीचा मास्टरमाईंड असल्याचे दिसून येत असून, मनिषने प्रश्नपत्रिका प्रिंट होण्यापूर्वीच पेपरमधी संभावित प्रश्न माहिती करुन घेतले होते. मनिषने प्रश्नपत्रिका प्रिंट होण्यापूर्वीच पेपरमधी संभावित प्रश्न माहिती करुन घेतले होते असे सांगितले जात आहे.

42 तास आधीच पेपर लीक

3 मे रोजी जेव्हा प्रामाणिक विद्यार्थी परीक्षा केंद्रावर घाम गाळत होते, तेव्हा काही ‘बाजारू’ प्रवृत्तींनी तुमच्या भविष्याचा सौदा आधीच केला होता. 1 मे रोजी सकाळीच प्रश्नपत्रिका टेलिग्राम आणि व्हॉट्सॲपवर फिरत होती. गुन्हेगारांनी याला ‘गेस पेपर’ असे नाव देऊन त्याची विक्री सुरू केली होती. धक्कादायक म्हणजे केरळमधील एका नामांकित मेडिकल कॉलेजच्या MBBS विद्यार्थ्याने 1 मे रोजी हा पेपर लीक केला आणि तो राजस्थानच्या ‘सीकर’ मधील कोचिंग हबपर्यंत पोहोचवला असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.

कपडे बदलले अन् संपूर्ण केस काढलेले होते

खैरनारबाबत माहिती देताना पोलिसांनी सांगितले की, ‘देशभरातून एकूण 16 आरोपींना ताब्यात घेण्यात आलं आहे. त्यातील नाशिकमधून शुभम खैरनार या संशयिताला ताब्यात घेतलं आहे. राजस्थान पोलिसांकडून सांगण्यात आलं होतं, त्यानुसार आम्ही त्याला ताब्यात घेतलं आहे. ‘आम्हाला नाव मिळालं होतं पण पत्ता आणि अधिक माहिती नव्हती. काही प्रमाणात तांत्रिक माहिती मिळवली आणि आम्ही शोध सुरु केला. त्याने त्याचे कपडे बदलले होते, संपूर्ण केस काढून टाकले होते. शुभम देवाच्या दर्शनासाठी जात असताना रस्त्यात सापळा रचून त्याला ताब्यात घेतल्याचे पोलिसांनी सांगितलं. राजस्थान पोलिसांच्या म्हणण्यानुसार नाशिकमधून नीटचा पेपर व्हाया हरियाणातून राजस्थानमध्ये पोहोचला होता’, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

CBSE 12 वीच्या Toppers ची आकडेवारी जाहीर; पुण्यात 87 टक्के विद्यार्थ्यांनी मिळवले 95 टक्क्यांहून जास्त गुण

तर, तपासात केरळमध्ये एमबीबीएसचे शिक्षण घेणाऱ्या एका विद्यार्थ्याने 2 मे रोजीच सीकरमध्ये राहणाऱ्या आपल्या वडिलांना जे एक पीजी हॉस्टेल संचालक आहेत त्यांना मोबाईलवर ‘गेस पेपर’ पाठवला असल्याचे सांगितले जात आहे. सोबत एक मेसेजही केला होता, ज्यात त्याने स्पष्टपणे सांगितले होते की, “हा पेपर तुमच्या हॉस्टेलमधील मुलींना द्या, उद्या परीक्षेत हेच प्रश्न येतील!” 3 मे रोजी सकाळीच हा पेपर विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचला. या पीजी चालकाने एका नामांकित कोचिंग क्लासच्या शिक्षकाला हा पेपर दाखवून पडताळणी केली, तेव्हा सत्य समोर आले.

धक्कादायक! नदी गायब करून दाखवला नाला; मंत्री पंकजा मुंडेच्या हस्तक्षेपाने थांबलं काम

नीट परीक्षेतील बायोलॉजीचे सर्व 90 प्रश्न हे 2000 प्रश्नांच्या गेस पेपरमध्ये होते, तर केमिस्ट्रीचे सर्व 45 प्रश्न 81 प्रश्नांच्या गेस पेपरमध्ये जसेच्या तसे आढळले. विशेष म्हणजे, या प्रश्नांमधील स्वल्पविराम किंवा पूर्णविरामही बदललेला नव्हता, ज्यावरून ही केवळ अफवा नसून प्रिंटिंग प्रेस किंवा यंत्रणेतून झालेली थेट पेपरफुटी असल्याचे स्पष्ट झाले आहे.

Exit mobile version