Traffic changes announced at Pune University Chowk : पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ मार्गावरील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी उपाययोजना करण्यात येत आहे. त्यानुसार काही मार्गावर वाहतूक वळविण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री व पुण्याचे पालकमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या उपस्थित झालेल्या बैठकीत घेण्यात आला आहे. वाहतुकीची कोंडी सोडविण्यासाठी आमदार सिद्धार्थ शिरोळे (Mla Siddharth Shirole) यांनी बैठकीत काही पर्यायांवर चर्चा केली आहे. त्यानुसार म्हसोबा गेट ते कृषी महाविद्यालयाचा अंतर्गत रस्ता खुला करण्यास तत्वतः मान्यताही देण्यात आली आहे.
Shreyas Talpade चं ह्रदयविकाराच्या झटक्यानंतर सई-सिद्धार्थसोबत गेस्ट अपिअरन्स देत दमदार कमबॅक
त्यानुसार सिंचननगर (भोसलेनगर) हा मार्ग सकाळी 7 ते रात्री 10.30 वाजेपर्यंत खुला करण्यात येणार आहे. पुणे वाहतूक पोलिसांशी (Pune City Traffic Police) समन्वय साधल्यानंतर काही दिवसांत हा मार्ग खुला केला जाणार आहे. या नवीन मार्गामुळे एफसी रोडवरून भोसलेनगर, खडकी, बोपोडी आणि औंधकडे जाणाऱ्या दुचाकी आणि चारचाकी वाहनांची सोय होईल. या पर्यायी रस्त्यामुळे प्रवासाच्या वेळेत लक्षणीय कपात होईल आणि पुणे विद्यापीठ सर्कल आणि लगतच्या रस्त्यांभोवतीची गर्दी कमी होईल, असा विश्वास आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी व्यक्त केला आहे.
बच्चू कडूही जरांगेंच्या आंदोलनात सहभागी होणार; म्हणाले, ‘सरकार म्हणून माझी भूमिका संपली…’
कृषी महाविद्यालयातील रस्ता वाहतुकीसाठी सर्वांसाठी खुले करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. येत्या काही आठवड्यांमध्ये याची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. पुणे विद्यापीठ मार्ग आणि लगतच्या भागातील गर्दी कमी करून, नागरिकांची गैरसोय लक्षणीयरीत्या कमी करण्यात येणार आहे. ऑगस्ट 2024 पर्यंत विद्यापीठ चौकातील उड्डाणपुलाचे बांधकाम पूर्ण केले जाईल, असे आश्वासन या बैठकीत देण्यात आले आहे.