Transfer IAS Officer : प्रशासकीय सेवेतील आयएएस (IAS) अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाचे अवर सचिव व्ही. राधा यांच्या आदेशान्वये आदेश पारीत करण्यात आले आहेत. यामध्ये, पुण्याचे (Pune) जिल्हाधिकारी आणि माजी आयएएस अधिकारी पूजा खेडकर प्रकरणामुळे चर्चेत आलेल्या डॉ. सुहास दिवसे यांना पदोन्नती देत त्यांची बदली करण्यात आली आहे. दिवसे यांच्याजागी साताऱ्याचे जिल्हाधिकारी (Collector) जितेंद्र डूडी यांना पदभार देण्यात आला आहे. तर, साताऱ्याच्या जिल्हाधिकारीपदी पुण्यातील जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्य शासनाच्या आदेशान्वये राज्यातील 10 आएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या असून काहींना पदोन्नती प्रमोशन देण्यात आलं आहे.
नगरकर हुशार…काम करणाऱ्यालाच पुन्हा संधी; आमदार जगतापांची विरोधकांवर टोलेबाजी
कोणाची कुठे बदली?
जयश्री भोज – अन्न व नागरी पुरवठा, सचिव
जितेंद्र डुडी – पुणे, जिल्हाधिकारी
विनीता वेद सिंघल – प्रधान सचिव कामगार, पर्यावरण
आय.ए. कुंदन – प्रधान सचिव, एसीएस स्कूल एज्युकेशन
मिलिंद म्हैसकर – एसीएस पब्लिक हेल्थ, वन
वेणुगोपाल रेड्डी – एसीएस वन आणि उच्च तंत्रशिक्षण
निपुण विनायक – रुसा सेक्रेटरी, पब्लिक हेल्थ
संतोष पाटील – सातारा, जिल्हाधिकारी
हर्षदीप कांबळे- प्रधान सचिव, सामाजिक न्याय
विकासचंद्र रस्तोगी प्रधान सचिव, उच्च व तंत्रशिक्षण, कृषी