आढाव दाम्पत्याच्या हत्येच्या निषेधार्थ वकिल संघटना आक्रमक, जिल्हाधिकारी कार्यालयावर काढला धडक मोर्चा

  • Written By: Published:
आढाव दाम्पत्याच्या हत्येच्या निषेधार्थ वकिल संघटना आक्रमक, जिल्हाधिकारी कार्यालयावर काढला धडक मोर्चा

अहमदनगर – नगर जिल्ह्याला हादरवून सोडणारी घटना राहुरी तालुक्यात घडली होती. वकिल दाम्पत्याची निर्घृणपणे हत्या (Lawyer couple brutally murdered) झाल्यानंतर वकिल संघटना (Advocates Association) आक्रमक झाल्या आहेत. आढाव वकिल दाम्पत्याची खंडणीसाठी (Extortion) हत्या करण्यात आल्याच्या निषेधार्थ आज अहमदनगर शहरातील वकिलांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर (ahmednagar collector office)) धडक मोर्चा काढला. संघटनेच्या  विविध मागण्याचे निवेदन जिल्हाधिकारी सालीमठ यांना देण्यात आले.

हृता दुर्गुळे पाहतेय तिच्या नवरोबाची वाट, कन्नीमधील रॅप सॉंग प्रदर्शित 

राहुरी तालुक्यात 25 जानेवारीला आढाव या वकील पती-पत्नीची खंडणी दिली नाही म्हणून अपहरण करून हत्या करण्यात आली होती. त्यानंतर जिल्ह्यातील वकिल संघटनेकडुन काम बंद आंदोलन केले. वकिलांनी जिल्हा न्यायालयासमोर धरणे आंदोलन सुरू होते. तर आढाव वकिल दाम्पत्याच्या कुटुंबियांना न्याय द्यावा, आरोपींवर मोक्का कायद्यान्वये कारवाई करावी या मागणीसाठी जिल्ह्यातील वकिलांनी शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला होता. या मोर्चात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात, राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजितदादा गट) आमदार संग्राम जगताप सहभागी झाले होते.

हृता दुर्गुळे पाहतेय तिच्या नवरोबाची वाट, कन्नीमधील रॅप सॉंग प्रदर्शित 

या मोर्चात हजारोच्या संख्येने वकिल सामिल झाले होते. यावेळी  संघटनेचे अध्यक्ष नरेश गुगळे  यांनी  आढाव दाम्पत्याची हत्या करण्याऱ्या आरोपींवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात यावी, सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात यावी आणि  वकिलांना संरक्षण कायदा लागु करण्यात यावा, अशा मागण्या केल्या. तसेच वकिलांना शस्त्र परवाना देण्यात यावा, अशीही मागणी जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ यांना निवेदन देऊन मागणी करण्यात आली.

दरम्यान, वकिल संघनेचा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयालयावर आल्यानंतर वकिलांनी मागण्यासंदर्भात घोषणा दिल्या. कार्यालयाचे गेट बंद असल्याने काही वेळ वकिल आक्रमक झाले होते. यावेळी महिला वकिलांसह अनेक वकिलांनी गेटवर चढून घोषणावाजी केली. कार्यालयाच्या दिशेने बाटल्या फेकल्या. त्यामुळं परिसरात काही काळ तणावाचे वातावरण होते.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube