हृता दुर्गुळे पाहतेय तिच्या नवरोबाची वाट, कन्नीमधील रॅप सॉंग प्रदर्शित

  • Written By: Published:
हृता दुर्गुळे पाहतेय तिच्या नवरोबाची वाट, कन्नीमधील रॅप सॉंग प्रदर्शित

kanni film : अभिनेत्री हृता दुर्गुळे (Hruta Durgule) ही मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री आहे. ‘फुलपाखरू’ या मालिकेमुळे हृता घराघरात पोहोचली. यानंतर तिने काही मराठी मालिकांमध्ये काम करून प्रेक्षकांची मने जिंकली. अनेक मराठी चित्रपटांमध्येही ती झळकली. दरम्यान, आता लवकरच हृता कन्नी या चित्रपटात दिसणार आहे. 8 मार्च रोजी प्रदर्शित होणाऱ्या ‘कन्नी’ (kanni film) चित्रपटाची सर्व प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. अशातच आता या चित्रपटातील पहिले गाणे सोशल मीडियावर झळकले आहे.

आधी भारत जिंकला, नंतर दगडफेक अन् निकालच बदलला; बांग्लादेशविरुद्धच्या सामन्यात काय घडलं? 

हे एक उत्तम रॅप सॉंग असून ‘नवरोबा’ असे या गाण्याचे बोल आहेत. यामध्ये अभिनेत्री हृता दुर्गुळे तिच्या जोडीदाराची आतुरतेने वाट पाहत असल्याचं दिसते. पुन्हा पुन्हा ऐकावे अशा या गाण्याला ज्योती भांडे आणि सीजर यांनी गायले असून या गाण्याचे बोल चैतन्य कुलकर्णी यांचे आहेत. तर एग्नेल रोमनने यांनी उत्कृष्ट संगीत दिले आहे. या गाण्यात हृतासोबत शुभंकर तावडे, वल्लरी विराज आणि ऋषी मनोहरही दिसत आहेत.

मॉरिसच्या डोक्यात अभिषेक घोसाळकरांबद्दल राग; म्हणायचा, ‘मी त्याला संपविणारच’, मॉरिसच्या पत्नीचा जबाब 

या गाण्यात मित्रांमध्ये असूनही हृतिकची नजर तिच्या आयुष्यात येणाऱ्या नवरोबाच्या शोधात आहे. फार आतुरनेतेने ती तिच्या आयुष्यात येणाऱ्या नवऱ्याची वाट पहात असून संपर्कात येणाऱ्या प्रत्येक मुलात ती नवरोबा शोधतेय. हृताचा हा नवरोबा शोध संपणार का, याचे उत्तर प्रेक्षकांना 8 मार्चला मिळणार आहे.

मल्हार पिक्चर्स कंपनी प्रस्तुत, नॉटी पेंग्विन एन्टरटेन्मेंट्स आणि बियॉन्ड इमॅजिनेशन फिल्म्स प्रॉडक्शन्स निर्मित, क्रोम फिल्म्स लिमिटेड यांच्या सहकार्याने प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन हे समीर जोशी यांनी केली. तर अमित भरगड, गगन मेश्राम, वैभव भोर, सनी रजनी यांनी निर्मिती केली आहे.

या गाण्यांबद्दल दिग्दर्शक समीर जोशी सांगतात की, हा मैत्री, प्रेम, स्वप्नं याभोवती फिरणारा चित्रपट आहे, त्यामुळे गाणीही तितकीच एनर्जेटिक असावी, असं मला वाटत होतं. आणि नवरोबच्या निमित्ताने माझी ही इच्छा पूर्ण झाली. या गाण्याची संपूर्ण टीफ अफलातून आहेत. चैतन्यचे बोल आणि एग्नेल रोमनचे उत्स्फुर्त संगीत या गाण्यात प्रचंड उर्जा आणत आहेत. त्यात ज्योती भांडे आणि सीजर यांची गायकी. सगळंच मस्त जमून आलं. रेकॉर्डिंग करतांना आम्ही हे गाणं खूप एन्जॉय केलं. मला खाईत्री आहे की, संगीतप्रेमींच्या ओठांवर हे गाणं रेंगाळेलं.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube