Pune Rain : राज्यात मान्सूनची सुरुवात झाली असून मुंबई, पुणेसह राज्यातील इतर काही भागात मुसळधार पाऊस होताना दिसत आहे. मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी झाडे कोसळण्याची देखील माहिती समोर येत आहे. काल 30 जून रोजी मुंबईतील चेंबूर परिसरात धावत्या शाळेच्या बसवर झाड कोसळ्याने एका विद्यार्थीचा मृत्यू झाला आहे तर काही विद्यार्थी जखमी असून त्याच्यावर उपचार सुरु आहे.
तर दुसरीकडे पुण्यात देखील अशीच घटना घडल्याची माहिती समोर येत आहे. पुण्यात सुरु असणाऱ्या रिमझिम पावसात शिलाई वर्ल्ड चौकात भररस्त्यात एक झाड कोसळल्याची धक्कादायक घटना घडली आहे. वाहतूक सुरु असताना झाड कोसळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी रस्ता ओलांडणारी एक तरुणी थोडक्यात बचावल्याची माहिती आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शिलाई वर्ल्ड चौकात (Shilai World Chowk) वाहातूक सुरु असताना एक मोठे झाड कोसळले. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात (CCTV Camera) कैद झाली असून या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या घटनेनंतर शहरातील धोकादायक अवस्थेत असणाऱ्या झाडांची पाहणी करुन उपाय योजना करण्यात यावे अशी मागणी देखील नागरिकांकडून होताना दिसत आहे.
JEE-NEET पॅटर्न बदलणार? पालकांना मिळणार मोठा आर्थिक दिलासा; जाणून घ्या नवीन नियम
‘युनिव्हर्सल स्कूल’ च्या बसवर झाड कोसळलं
तर दुसरीकडे 30 जून दुपारी 2:50 च्या सुमारास मुंबईतील चेंबूर येथील रोड क्रमांक 11 वर ‘युनिव्हर्सल स्कूल’च्या बसवर झाड कोसळल्याने अपघात झाला. या घटनेनंतर लगेचच बसमधील सर्व विद्यार्थ्यांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले. जखमी विद्यार्थ्यांना तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले आहे. अपघाताच्या वेळी बसमध्ये 13 विद्यार्थी होते. या घटनेत जखमी झालेल्या चार विद्यार्थ्यांवर चेंबूरमधील ‘झेन हॉस्पिटल’मध्ये उपचार सुरू आहेत. या घटनेत एकाचा विद्यार्थीचा मृत्यू झाला आहे.
