Download App

Pune News : खडकवासला धरणात ९ मुली बुडाल्या, ७ जणींना वाचवण्यात यश; दोघींचा मृत्यू

Pune News : खडकवासला धरणाच्या पाण्यात गोऱ्हे बुद्रुक गावच्या हद्दीमध्ये पोहण्यासाठी गेलेल्या दोन मुली बुडाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. खडकवासला, डोणजे, गोर्हे गाव येथे आलेल्या ९ मुलींपैंकी ७ मुली पाण्यात उतरल्या होत्या. परंतु ७ पैंकी ५ मुलींना स्थानिकांनी सुखरुप वाचविले आणि इतर २ मुलींचा मृतदेह पीएमआरडीए अग्निशमन जवानांनी पाण्याबाहेर काढला आहे. शासकीय रुग्णवाहिका १०८ घटनास्थळी दाखल होत्या. सर्व मुली बुलढाणा जिल्ह्यातील असल्याची प्राथमिक माहिती समजली आहे.

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष Jayanat Patil यांना पुन्हा ईडीची नोटीस चौकशीला हजर राहण्याचे आदेश

पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या अग्निशमन दलाला (fire brigade) पाचारण करण्यात आले आहे. त्यांनी शोध घेऊन एक मुलगी पाण्याबाहेर काढले आणि दुसऱ्या मुलीचा शोध सुरू आहे.

सकाळी एकूण नऊ मुली गोरे बुद्रुक येथील कलमाडी फार्म च्या मागील बाजूस पोहण्यासाठी गेल्या. त्यातील सात मुली पोहण्यासाठी धरणाच्या पाण्यामध्ये उतरल्या. त्यांना पाण्याचा अंदाज न आल्याने त्या पाण्यात बूडत होत्या.

दंगलीनंतर शेवगावची झाली पोलीस छावणी

त्यावेळी तेथे दशक्रियाविधीसाठी आलेल्या लोकांच्या हा प्रकार लक्षात येताच त्यांनी धाव घेतली. खुशी संजय खुर्दे (वय 14), शीतल भगवान टिटोरे (वय 15 ) या दोन्ही मुलींचा मृत्यू झाला आहे. तर कुमुदिनी खुर्डे (वय 10), शीतल अशोक लहाने (वय 16), पायल संजय लहाने (वय 12), राशी सुरेश मांडवे (वय 7), पल्लवी संजय लहाने (वय 10), पायल संतोष सावळे (वय 16), मीना लहाने (वय 35) या मुलींना वाचवण्यात पीएमआरडीए अग्निशमन जवानांना यश आले आहे.

Tags

follow us