Download App

निवडणुकीत पैशाचा अमाप वापर, सत्यमेव जयते नाही, तर सत्तामेव जयते सुरू…; उद्धव ठाकरे कडाडले

निवडणुकीत पैशाचा अमाप वापर झाला, आता सत्यमेव जयते नाही, तर सत्तामेव जयते सुरू झालं, असं ठाकरे म्हणाले.

  • Written By: Last Updated:

Uddhav Thackeray : विधानसभा निवडणुकीत (Vidhansabha Election) महायुतीला (Mahayuti) 200 हून अधिक जागा मिळाल्या. तर विरोधकांच्या महाविकास आघाडीतील अनेक दिग्गज नेत्यांना पराभवाला सामोरे जावे लागले. या निकालाबाबत विरोधी पक्षाच्या नेत्यांनी ईव्हीएमवर शंका उपस्थित केली. अशातच ज्येष्ठ समाजसेवक बाबा आढाव (Baba Adhav) यांनी याबाबत आत्मक्लेष आंदोलन सुरू केलं. आज त्यांच्या आदोलनाला उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray s) भेट दिली. यावेळी त्यांनी सत्ताधाऱ्यावर निशाणा साधला.

उद्धव ठाकरेंच्या विनंतीनंतर ईव्हीएमविरोधातील बाबा आढावांचे आत्मक्लेश आंदोलन मागे 

निवडणुकीत पैशाचा अमाप वापर झाला, आता सत्यमेव जयते नाही, तर सत्तामेव जयते सुरू झालं, असं ठाकरे म्हणाले.

ईव्हीएमवर विरोधात बाबा आढाव यांचे मागील तीन दिवसांपासून पुण्य़ात आत्मक्लेश आंदोलन सुरू आहे. विधानसभा निवडणुकीत घोटाळा झाल्याचा, ईव्हीएमचा गैरवापर झाल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला. त्यानंतर आज शरद पवार, अजित पवार यांनी आंदोलनाला भेट दिली. तर आता उद्धव ठाकरेंनी आढाव यांच्या आंदोलनस्थळाला भेट दिली. यावेळी बोलतांना ठाकरे म्हणाले की, बाबा आढाव यांची आजची ही भेट ही आयुष्यभर लक्षात राहिल. आजही ते म्हातारपण स्वीकारायला तयार नाहीत. आज जिंकलेले आणि हरलेले देखील बाबा आढाव यांच्या आत्मक्लेष आंदोलनाला भेटी देत आहे. कारण, निकालावर जिंकलेल्यांचा विश्वास नाही आणि हरलेल्यांचा आपण हरलो तरी कसे, यावर  विश्वास नाही, असं ठाकरे म्हणाले.

उद्धव ठाकरेंच्या विनंतीनंतर ईव्हीएमविरोधातील बाबा आढावांचे आत्मक्लेश आंदोलन मागे 

यावेळी खासदार संजय राऊत, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे जयंत पाटील, सुषमा अंधारे  आदी उपस्थित होते.

पुढं बोलतांना ठाकरे म्हणाले की,  राक्षसी बहुतमत मिळालं, मग आनंदी वातावरण का नाही?  सगळ्यांचे चेहरे पडले का आहेत? राक्षसी बहुमत मिळाल्यावरही काही जणांना शेतात पूजा अर्चा करायला का जावं लागतंय?  असं म्हणत ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल करत फेर मतमोजणीची मागणी केली.

आता विधानसभेची मुदत संपलेली असताना राष्ट्रपती राजवट का लागली नाही, असा सवाल ठाकरेंनी केला. यावेळी त्यांनी  वनवा पेटवायला एक ठिणगी पुरेशी असते. हे आंदोलन म्हणजे ठिणगी आहे, असंही ते म्हणाले.

बाबा आढाव यांचे उपोषण मागे…
डॉ. बाबा आढाव यांनी तीन दिवसांपासून सुरू असलेले उपोषण आज मागे घेतले. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते त्यांनी पाणी घेत उपोषण संपवले. उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीने हे आंदोलन राज्यभर नेले पाहिजे, अशी अपेक्षाही आढाव यांनी व्यक्त केली.

follow us