Video : धनंजय मुंडेंनी विधानसभा निवडणुकीत दगा दिला; आष्टीचे मावळते आमदार आजबेंचा गौप्यस्फोट
Balasaheb Ajabe on Dhananjay Munde : महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका नुकत्याचं पार पडल्या. सध्या सत्ता स्थापनेच्या हालचाली सुरू आहेत. 23 नोव्हेंबर रोजी निकाल लागला असला तरी अद्याप मुख्यमंत्रीपदाबद्दल अधिकृत अशी घोषणा महायुतीकडून झालेली नाही. त्यामुळे मुख्यमंत्री पदासह बाकी अनेक घडामोडींबद्दल उलट-सुलट चर्चा सुरू आहेत. (Balasaheb Ajabe) अशा वातावरणातचं महायुतीमधील घटकपक्ष असलेल्या राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या मावळत्या आमदाराने खळबळजनक गौप्यस्फोट केले आहेत.
आष्टी पाटोदा शिरुर या मतदारसंघात महायुतीमध्ये मैत्रीपूर्ण लढत झाली. येथे भाजपकडून सुरेश धस उमेदवार होते. भाजपमधील बंडखोर भिमराव धोंडे अपक्ष होते. तर, राष्ट्रवादी अजित पवार यांच्या पक्षाकडून मावळते आमदार बाळासाहेब आजबे यांना उमेदवारी देण्यात आली होती. तसंच, राष्ट्रवादी शरद पवार यांच्या पक्षाकडून मेहबूब शेख यांना उमेदवारी देण्यात आली होती. या लढतीत सुरेश धस यांनी सुमारे 78 हजारांच्या फरकाने विजय मिळवला. तर बाळासाहेब आजबे हे चौथ्या क्रमांकावर फेकले गेले. या सगळ्या गोष्टींवर आजबे यांच्याशी लेट्सअप मराठीशी संवाद साधला आहे. त्यामध्ये त्यांनी अनेक धक्कादायक दावे, खुलासे केले आहेत.
सुरेश धस सोपे नाहीत; मुंडे बंधू-भगिनींना पुरून उरणार!
मी भाजपमधून राष्ट्रवादीमध्ये जो प्रवेश केला तो फक्त धनंजय मुंडे यांच्या आग्रहाखातर केला. त्यांच्या मानेवर मान टाकून मी तो प्रवेश केला होता. परंतु, या निवडणुकीत धनंजय मुंडे यांनी मला आवश्यक होती ती साथ दिली नाही. माझ्याशी दगाफटका झाला असा थेट आरोपच आजबे यांनी केला आहे. त्यांनी जर माझ्या प्रचाराचे सुत्र हाती घेतले असते तर चित्र काही वेगळ दिसलं असतं असही आजबे यावेळी म्हणाले. त्यांच्या या आरोपांनंतर आष्टी मतदारसंघात आता वेगगेवळ्या चर्चा रंगल्या आहेत. कारण, निवडणुकीचा निकाल लागताच विजयी उमेदवार सुरेश धस यांनी पंकजा मुंडे यांच्यावर गद्दारी केल्याचा आरोप केला. आपल्याला त्यांनी फसवल असा आरोप केला होता. त्यांनंतर आता आजबे यांनीही धनंजय मुंडेंवर आरोप केल्याने मोठी खळबळ उडाली आहे.
विद्यमान आमदार असताना फक्त 22 हजार मतदान पडलं याबद्दल आजबे म्हणाले हा पराभव मला मान्यच नाही. कारण माझ्या सभा, माझे दौरे मी पाहतो. यामध्ये मला काहीतरी गडबड वाटेत असं म्हणत आजबे यांनी ईव्हीएम मशीनवरच शंका उपस्थित केही आहे. त्याचबरोबर, जर हे मतदान खर असेल तर चांगल्या माणसाने राजणात राहू नये या मताचा मी आहे अशी खंतही आजबे यांनी यावेळी व्यक्त केली आहे. कारण, लोकांची काम केली, अनेक नवी काम आणली. परंतु, आपल्याला या पद्धतीचं मतदान होत असेल तर आपण या मार्गावर असू नये या मताचा मी आहे. आणि पुढच्या पिढीलाही यामध्ये आपण पाठवावं की नाही असा विचार आपण करत असल्याचंही आजबे यावेळी म्हणाले.