रासप’चे शरदराव बाचकरांचा राष्ट्रवादी अजित पवार गटातत प्रवेश, शिवाजीराव कर्डिलेंच्या प्रचारात सक्रिय

  • Written By: Published:
रासप’चे शरदराव बाचकरांचा राष्ट्रवादी अजित पवार गटातत प्रवेश, शिवाजीराव कर्डिलेंच्या प्रचारात सक्रिय

Sharadrao Bachkar with Shivajirao Kardile : राहुरी येथील राष्ट्रीय समाज पक्षाचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष तथा जिल्हा मच्छीमार सहकारी संघाचे चेअरमन शरदराव बाचकर यांनी रासपच्या राजीनामा दिल्यानंतर कार्यकर्त्यांशी चर्चा करून राष्ट्रवादी अजित पवार गटामध्ये  सुनेत्राताई पवार यांच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांसह प्रवेश केला आहे. (Shivajirao Kardile ) दरम्यान, ते शिवाजीराव कर्डीले यांच्यासाठी प्रचारात सक्रिय झाले आहेत.

शिवाजीराव कर्डिले यांची ताकद वाढली; अखिल भारतीय ओबीसी सेवा संघाने दिला जाहीर पाठिंबा

शरदराव बाचकर, शशिकांत मतकर, अनिताताई बागुल, संजय वाघमोडे, नारायणराव रोडे, आनंद देवकाते हे प्रमुख नेत्यांसह मोरे, कपिल लाटे, नितीन शहाणे, अशोक बाचकर, दीपक बाचकर, उत्कर्ष बाचकर, भारत हापसे, आदेश मतकर व अलकाताई पवार व असंख्य कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विचारांनी प्रेरित होऊन खा. सुनेत्राताई पवार, पार्थ पवार व राष्ट्रवादीचे प्रदेश युवक नेते अक्षय शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत असंख्य कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.

राहुरी विधानसभा मतदारसंघातील भाजपा व महायुतीचे उमेदवार शिवाजीराव कर्डिले यांना पाठिंबा जाहीर करत सर्व कार्यकर्त्यांनी कर्डिले यांना विजयी करण्यासाठी मैदानात उतरावे, असे आवाहन देखील बाचकर यांनी केले आहे. बाचकर यांच्या प्रवेशामुळे शिवाजीराव कर्डीले यांचं पार्ड जड झाल्याची सध्याची परिस्थिती आहे. अनेक कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे भाजप आणि मित्र पक्षांच्या सहकार्याने शिवाजीराव कर्डीले प्रचारात उतलेलेले पाहायला मिळत आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube