Akshay Kardile : वडिलांसाठी मुलाने बांधली मोट; राहुरीत युवकांचं संघटन…
Akshay Kardile : माजी आमदार शिवाजीराव कर्डिले यांचे चिरंजीव अक्षय कर्डिले (Akshay Kardile) मागील अनेक वर्षांपासून समाजकारणात सक्रिय आहेत. भाजप युवा मोर्चाच्या माध्यमातून अक्षय कर्डिलेंनी राहुरी-नगर-पाथर्डी मतदारसंघात युवकांचे (Rahuri Assembly Constituency) अनेक प्रश्न मार्गी लावून मोठी फळी निर्माण केलीयं. यंदाच्या निवडणुकीत वडिलांसाठी मुलाने चांगलीच मोट बांधलीयं. राहुरी विधानसभा मतदारसंघात युवा वर्गाचं मोठ्या संख्येचं मतदान आहे. त्यामुळे युवकांचे मतदान निर्णायक ठरणार असल्याच्या चर्चा आहेत. या निवडणुकीत महायुतीचे उमदेवार शिवाजीराव कर्डिले (Shivajirao Kardile) यांना युवकांच्या संघटनेचा मोठ्या प्रमाणात फायदा होऊन, ते विजयाच्या उंबरठ्यावर पोहोचतील, असा दावा युवकांकडून केला जात आहे.
निवडणुकीनंतर राजकीय समीकरणं बदलणार, गणितं जुळवायला खूप वाव ; दिलीप वळसे पाटील
राहुरी मतदारसंघात एकीकडे शिवाजीराव कर्डिले आपल्या जनसंपर्कातील नागरिकांना सोबत घेत मतदारसंघ पिंजून काढत आहेत. तर दुसरीकडे चिरंजीव अक्षय कर्डिले आपल्या युवा संघटनेच्या माध्यमातून मतदारसंघातील वाड्या, वस्त्या, गावांमध्ये पोहोचून प्रचार करीत आहेत. या प्रचारादरम्यान, अक्षय कर्डिले यांना चांगला प्रतिसाद मिळत असून याचा मोठा मोठा फायदा भाजपला होण्याची शक्यता आहे.
माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांचे चिरंजीव अक्षय कर्डिले यंदाच्या निवडणुकीत चांगलेच सक्रिय झाले आहेत. वडिलांचा समाजकारणाचा वारसा पुढे नेताना त्यांनी युवा वर्गात आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे. मतदारसंघातील राहुरी तालुक्यासह नगर तालुका, पाथर्डी तालुक्यात त्यांनी मागील सहा महिन्यांपासून दौरे करून युवकांची फळी उभी केलीयं. स्वतः शिवाजीराव कर्डिले प्रत्यक्ष मतदारांच्या गाठीभेटी घेत असताना अक्षय कर्डिले यांनी विविध घटकांशी संवाद साधत प्रचारयंत्रणा अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने सक्रिय केली आहे. सर्वांशी आपुलकीने संवाद साधत त्यांनी मतदार जोडण्यात महत्वाची भूमिका बजावलीयं.
माजी आमदार अपक्ष झाले अन् थेट स्पर्धेत आले; अदृश्य शक्ती करणार उलथापालथ?
अक्षय कर्डिलेंच्या साधेपणाची भूरळ…
अक्षय कर्डिले यांचा साधेपणा आणि सर्वसामान्य जनतेसह युवकांशी आपुलकीने संवाद साधण्याच्या हातोटीची जनतेला भूरळ पडत आहे. त्यांच्या निगर्वी स्वभावामुळे सर्वसामान्य जनतेत आपुलकीची भावना वाढत असून त्यांनी युवकांना संघटीत करुन प्रचार प्रक्रियेत सक्रिय केले आहे. युवकांनी सहभाग घेतल्याने त्याचा थेट परिणाम निवडणुकीच्या निकालात दिसून येईल, अशी चर्चा रंगलीयं.
आजही कर्डिले कुटुंबावर जनतेचा विश्वास अन् प्रेम…
माझे वडिल शिवाजीराव कर्डिले नेहमीच मतदारसंघाच्या सर्वसामान्य जनतेसाठी सक्रिय आहेत. वेळ पडल्यास ते कुटुंबियांना वेळ न देता जनतेसाठी आपला वेळ खर्च करतात. हीच जनसेवा त्यांनी आजही काय राखलीयं. त्यामुळेच कर्डिले कुटुंबावर जनतेने नेहमीच प्रेम आणि विश्वास दाखवून दिलायं. मागील निवडणुकीत काही कारणांनी पराभव झाल पण आता जनताच परिवर्तनासाठी सज्ज झाली असल्याचं अक्षय कर्डिले यांनी स्पष्ट केलंय.