माजी आमदार अपक्ष झाले अन् थेट स्पर्धेत आले; अदृश्य शक्ती करणार उलथापालथ?

माजी आमदार अपक्ष झाले अन् थेट स्पर्धेत आले; अदृश्य शक्ती करणार उलथापालथ?

Maharashtra Elections 2024 : अहिल्यानगर जिल्ह्यात यंदा निवडणूक अतिशय अटीतटीची होणार आहे. काही मतदारसंघांत महायुती तर काही ठिकाणी महाविकास आघाडीत बंडखोरी झाली आहे. अपक्ष आणि बंडखोरांची रेलचेल दिसत आहे. निवडणुकीआधी शिवसेना आणि राष्ट्रवादीत फूट पडल्याने सगळ्यांचीच गणितं बिघडली आहेत. अनेक दिग्गज नेत्यांना तिकीट सुद्धा मिळालं नाही. त्यामुळे या नेत्यांना नाईलाजाने अपक्ष उमेदवारी करावी लागली आहे. जिल्ह्यातील श्रीगोंदा, नेवासा, पारनेर, शेवगाव-पाथर्डी, अकोले या मतदारसंघांत ही स्थिती प्रकर्षाने दिसून येत आहे. तसेच या मतदारसंघांत अपक्षांची संख्या देखील जास्त आहे. माजी आमदार चक्क अपक्ष म्हणून निवडणुकीत उतरले आहेत.

शेवगाव-पाथर्डी मतदारसंघांत चौरंगी लढत होत आहे. येथे महायुतीने विद्यमान आमदार मोनिका राजळे यांनाच तिकीट दिलं आहे. शरद पवार गटाने प्रताप ढाकणे यांना तर माजी जिल्हा परिषद सदस्य हर्षदा काकडे आणि माजी आमदार चंद्रशेखर घुले पाटील अपक्ष निवडणुकीत आहेत. चंद्रशेखर घुले यांचे मतदारसंघांत मोठं वजन आहे. त्यांचा जनसंपर्क ही दांडगा आहे. ढाकणे आणि राजळे यांच्याविषयीची नाराजी, त्यांची निष्क्रियता आणि उद्याच्या सत्तेत घ्यावी लगणारी अपक्षांची साथ विचारात घेता घुले पाटील यांनी त्यांची उमेदवारी विचारपूर्वक ठेवल्याचे मानले जाते.

राजळे यांच्या पाथर्डी तालुक्यात मतविभाजन होण्याची दाट शक्यता आहे. याचा फायदा घुले यांना होऊ शकतो. परंतु हा फायदा तेव्हाच होईल जेव्हा घुले शेवगावमधून निर्णायक आघाडी घेण्यात यशस्वी होतील. असे संभाव्य गणित आहे. आता हे गणित कितपत बरोबर येईल याचं उत्तर निवडणुकीच्या निकालातूनच समोर येणार आहे. सध्या या मतदारसंघात अटीतटीची लढत होईल अशी चिन्हे दिसत आहेत.

मतदारसंघाच्या विकासाचा कर्डिलेंचा शब्द; ‘राहुरी’त प्रचार अन् नागरिकांशी संवाद..

माजी आमदार वैभव पिचड अपक्ष

अकोले मतदारसंघांत यंदा बहुरंगी लढत होत आहे. परंतु मुख्य लढत आमदार किरण लहामटे आणि माजी आमदार वैभव पिचड यांच्यात होणार आहे. आमदार लहामटे आधी भाजपात होते. जिल्हा परिषद सदस्य म्हणूनही त्यांनी काम पाहिले होते. पिचड यांनी भाजपात प्रवेश करताच लहामटे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश घेतला. आणि मागील निवडणुकीत वैभव पिचड यांचा पराभव केला. आताच्या निवडणुकीत हेच पिचड अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात आहेत.

नेवाशात खास घडलं, माजी आमदाराच्या हाती बॅट

यंदा नेवासा विधानसभा मतदारसंघात मोठा ट्विस्ट आला आहे. जागावाटपात हा मतदारसंघ शिंदे गटाच्या वाट्याला गेला. त्यामुळे भाजपकडून तयारी करत असलेले माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांची मोठी कोंडी झाली. त्यामुळे त्यांनी ऐनवेळी प्रहार पक्षाकडून तिकीट मिळवलं. आता या मतदारसंघात शिंदे गटाचे विठ्ठलराव लंघे, आमदार शंकरराव गडाख आणि माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे अशी तिरंगी लढत होणार आहे.

नेवाशातील निवडणुकीचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे मागील निवडणुकीत शंकरराव गडाख यांनी बॅट या चिन्हावर निवडणूक लढवून विजय मिळवला होता. आता माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांना बॅट चिन्ह मिळालं आहे. त्यामुळे निवडणूक प्रचारात मुरकुटे या बॅट चिन्हावर मतदान करण्याचं आवाहन नागरिकांना करताना दिसत आहेत.

श्रीगोंद्यात ठाकरेंचा प्लॅन अन् माजी आमदाराची कोंडी

यंदा श्रीगोंदा मतदारसंघाची जोरदार चर्चा सुरू आहे. यामागे कारणही तसच आहे. तालुक्यात राजकीय ताकद फारशी नसतानाही ठाकरे गटाने हट्टापायी हा मतदारसंघ स्वतः कडे घेतला. त्यामुळे शरद पवार गटाकडून तयारी करत असलेल्या माजी आमदार राहुल जगताप यांची चांगलीच कोंडी झाली. त्यांना पक्षच राहिला नाही. त्यामुळे जगताप यांनी अपक्ष निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला. या मतदारसंघात ठाकरे गटाने नुकत्याच पक्षात आलेल्या अनुराधा नागवडे यांना उमेदवारी दिली आहे. महायुतीने विक्रम पाचपुते, वंचित बहुजन आघाडीने अण्णासाहेब शेलार, सुवर्णा पाचपुते यांच्यात लढत होणार आहे.

वळसे पाटील अजितदादांसोबत का गेले?; लेक पूर्वा वळसे पाटलांची पोस्ट चर्चेत

पारनेर मतदारसंघात महायुतीने काशिनाथ दाते यांना संधी दिली आहे. महाविकास आघाडीने राणी लंके यांना तिकीट दिलं आहे. माजी आमदार विजय औटी यांनी उमेदवारी कायम ठेवली आहे. यंदा मात्र औटी अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात आहेत. पारनेर नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष विजय सदाशिव औटी देखील रिंगणात आहेत. तसेच शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख संदेश कार्ले यांनी बंडाचे निशाण हाती घेतले. कार्ले अपक्ष म्हणून रिंगणात आहेत.

नगर तालुक्यातील दोन जिल्हा परिषद गटांतील गावे पारनेर विधानसभा मतदारसंघाला जोडलेली आहेत. या दोन्ही गटांतील गावांतील मिळून जवळपास एका लाख मतदार पारनेरला जोडली आहेत. नगर तालुक्याचा आमदार करण्याची संधी अशी टॅगलाईन घेऊन संदेश कार्ले यांनी बंडाचे निशाण हाती घेतले. कार्ले यांनी माघार घ्यावी यासाठी भरपूर प्रयत्न झाले. मात्र, कार्ले यांनी लढण्याचा निर्धार कायम ठेवला. त्यामुळे या मतदारसंघातील निवडणूक अटीतटीची होणार आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube