Shivajirao Kardile : आदल्याच दिवशी सुजय विखेंचा हात धरुन पायऱ्या उतरले; माणसातला माणूस कर्डिलेंचा भावूक करणारा फोटो…

Shivajirao Kardile : भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते शिवाजी भानुदास कर्डीले यांनी वयाच्या ६६ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला.

Kardile

MLA Shivajirao Kardile : भाजपचे ज्येष्ठ नेते आणि आमदार शिवाजीराव कर्डिले (MLA Shivajirao Kardile) यांची आज पहाटेच्या सुमारास प्राणज्योत मालवली. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत विद्यमान आमदाराचा मोठ्या फरकाने पराभव करीत कर्डिले महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा सक्रिया झाल्याचे पाहायला मिळाले. कालच्या (गुरुवारी) दिवशीच त्यांचा जिल्ह्यातील अनेक ठिकाणी नियोजित दौरा होता. याच दौऱ्यादरम्यान, कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेत असतानाचे काही क्षण टिपले गेले आहेत. विशेष म्हणजे माजी खासदार सुजय विखे पाटील यांचा हात धरुन पायऱ्या उतरतानाचा कर्डिलेंचा फोटो पाहुन अनेकजण भावूक होत असल्याचं पाहायला मिळतंय.

Shivajirao Kardile

Shivajirao Kardile

आमदार कर्डिले गेल्या काही दिवसांपासून आजारी होते. मोठ्या आजारातून बरे झाल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना विश्रांतीचा सल्ला दिला होता. मात्र, कर्डिले हे सर्वसामान्यांतून निवडून आलेलं व्यक्तिमत्व असल्याने कर्डिले यांनी दैनंदिन जनता दरबार भरवत नागरिकांच्या समस्या सोडवण्यास प्रथम प्राधान्य दिलं. यासोबतच दैनंदिन दौऱ्यालाही ते जात असत.

Kardile

Kardile

काल गुरुवारी कर्डिले दिवसभरातील कार्यक्रमात उपस्थित होते. यावेळी कार्यकर्त्यांकडून त्यांचा गुलाबाच्या फुलांनी सत्कार करण्यात आला होता. कर्डिले पुन्हा एकदा आता सर्वसामान्यांमध्ये मिसळत सक्रिय झाल्याची गुणगुण जिल्हाभरात पसरत होती. अहिल्यानगर जिल्हा सहकारी मध्यवर्ती बॅंकेचे ते अध्यक्षही होते. विधानसभा निवडणुकीच्या आधीच माजी खासदार सुजय विखे आणि मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी त्यांच्यासाठी विशेष प्रयत्न केल्याचं दिसून आलं होतं.

follow us