शिवाजीराव कर्डिले यांची ताकद वाढली; अखिल भारतीय ओबीसी सेवा संघाने दिला जाहीर पाठिंबा

  • Written By: Published:
शिवाजीराव कर्डिले यांची ताकद वाढली; अखिल भारतीय ओबीसी सेवा संघाने दिला जाहीर पाठिंबा

Shivajirao Kardile : राज्यातील ओबीसी समाजाला न्याय मिळवून देण्याचं काम भारतीय जनता पक्षाकडून होत आहे, असा विश्वास व्यक्त करीत अखिल भारतीय ओबीसी सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष हनुमंत सुतार यांनी महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीसाठी (Shivajirao Kardile) भाजप महायुतीला पाठिंबा जाहीर केला आहे. या पाठिंब्यामुळे राहुरी विधानसभा मतदारसंघाचे शिवाजीराव कर्डीले यांची ताकद चांगलीच वाढली आहे.

हनुमंत सुतार यांच्यासह राज्य उपाध्यक्ष अंबादास धनगर, महाराष्ट्र कार्याध्यक्ष तेजस टेंगले यांनी संघटनेच्या सर्व पदाधिकारी, कार्यकर्त्यांना भाजप महायुतीच्या उमेदवारांना पाठिंबा देण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार नगर जिल्ह्यातील राहुरी मतदारसंघात भाजपचे उमेदवार माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांना ओबीसी सेवा संघाने पाठिंबा दिला आहे, अशी माहिती महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा राणी पंडित यांनी दिली आहे.

विकासाचा अनुशेष भरून काढायचा एवढ्याच विचाराने मी यावेळी निवडणूक लढतोय -शिवाजीराव कर्डिले

ओबीसी सेवा संघाचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, सदस्य कर्डिले यांच्या प्रचारात सक्रिय झाले असून कर्डिले यांच्या विजयासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याची ग्वाही त्यांनी दिली आहे. अनेक दिवसांपासू धनगर आरक्षण, मराठा आरक्षण असे मुद्दे राज्यात गाजत आहेत. त्यामध्ये ओबीसी आंदोलनाचाही मोठा मुद्दा समोर आला होता. परंतु, या दोन्ही आंदोलनामध्ये शिवाजीराव कर्डीले हे सामाजिक सलोखा राखण्यासाठी महत्वाची भूमिका घेत असल्याचं पाहायला मिळत होत.

यावेळी विधानसभा मतदार संघात जोरदार शक्ती प्रदर्शन दिसत आहे. यंदाच्या या निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर राहुरीत दोन गटातमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळत आहे. शिवाजीराव कर्डिले आणि प्राजक्त तनपुरे यांच्यातील ही लढत आता अतीतटीची होत असल्याचं दिसून येत आहे. याचं कारण म्हणजे यंदाची विधानसभा निवडणूक आणि आधीच्या निवडणूकीत झालेला कर्डिले यांचा पराभव. 2019 मध्ये राहुरी निवडणूकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून तनपुरे कर्डीले यांच्यापेक्षा एक लाख मतांनी विजयी झाले होते.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube