Download App

मोठी बातमी : अजितदादांच्या राष्ट्रवादीत भूकंपाच्या हालचाली; अंधारेंच्या ट्विटने राजकीय वर्तुळात हादरा

अंधारेंच्या ट्विटनंतर अजितदादांच्या राष्ट्रवादीत येत्या काळात राजकीय भूकंप होऊ शकतो अशी शक्यता वर्तवली जात आहे.

  • Written By: Last Updated:

पुणे : शिवसेना उबाठाच्या नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक ट्विट केले आहे. त्यांच्या या ट्विटनंतर अजितदादांच्या राष्ट्रवादीत येत्या काळात राजकीय भूकंप होऊ शकतो अशी शक्यता वर्तवली जात आहे. अंधारे यांच्या ट्विटमध्ये त्यांनी राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली पाटील ठोंबरे (Rupali Patil Thombre) यांना ठाकरे गटात येण्याची ऑफर दिली आहे. रुपालीताई, अजून किती मुस्कटदाबी सहन करणार? निर्णय घेण्याची हीच ती योग्य वेळ… अश्या अश्याचे सुषमा अंधारे यांनी ट्विट केले आहे. त्यांच्या या ट्विटमुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे. अंधारेंच्या या ट्विटवर अद्याप रूपाली ठोंबरे यांची कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. त्यामुळे यावर सस्पेन्स कायम असून, त्यांच्या प्रतिक्रियेनंतरच नेमकं सत्य काय? याचा खुलासा होणार आहे. (Sushma Andhare Tweet On Rupali Thombre )

लोकसभेतील दारूण पराभवाचा फटका?

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकांमध्ये महायुतीला मोठा फटका बसला. यात भाजपला 9, शिवसेनेला 7 तर, अजितदादांच्या राष्ट्रवादीला केवळ एका जागेवर विजय मिळवता आला. या मोठ्या फरकानंतर अजितदादांच्या राष्ट्रवादीत अनेकजण नाराज असल्याचे सांगितले जात आहे. तर, मविआने या निवडणुकीत मोठा चमत्कार केला. राष्ट्रवादीचा झालेल्या दारूण पराभवानंतर अनेकजण अजितदादांना जय महाराष्ट्र करून शरद पवारांकडे जाण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. एवढेच नव्हे तर, अजितदादांचे अनेक नेते पवारांच्या संपर्कात असल्याचाही दावा केला जात आहे.

अंधारेंचे ट्विट काय?

निष्कलंक चारित्र्य, उत्तम जनसंपर्क, निडरता, रोखठोक, नेत्यांच्या मागेपुढे करून नाही तर लोकांमध्ये मिसळून काम करणारी लढाऊ कार्यकर्ता.. तरीही अजून किती दिवस उपेक्षित राहणार? रूपालीताई, अजून किती मुस्कटदाबी सहन करणार? निर्णय घेण्याची हीच ती योग्य वेळ…

follow us

वेब स्टोरीज