‘लबाड लांडग्याचं पिल्लू’ म्हणणारा ‘बांडगूळ’च; रुपाली ठोंबरे-पाटलांनी सुनावलं…
Rupali Thombare-Patil : मागून अन् पुढून चालणाऱ्या बांडगूळासारखेच गोपीचंद पडळकर(Gopichand Padalkar) असल्याचं म्हणत राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली ठोंबरे पाटील(Rupuali Thombare Patil) यांनी भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांना सुनावलं आहे. सध्या राज्यात धनगर आरक्षणाचा मुद्दा गाजत असल्याने या मुद्द्यावरुन गोपीचंद पडळकरांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर खालच्या पातळीवर वक्तव्य केलं. त्यावरुन रुपाली ठोंबरे-पाटील यांनी पडळकरांना सुनावलं आहे.
स्वातंत्र्याच्या चळवळीचा साक्षीदार ‘इंडिया क्लब’ होणार बंद, ‘शशी थरूर कुटुंबाचे आहे खास नाते’
पुढे बोलताना ठोंबरे-पाटील म्हणाल्या, बांडगूळ जसं पुढून चालतं, तसंच मागूनही चालतं त्या पद्धतीचे गोपीचंद पडळकर आहेत, बांडगूळ गोपीचंद पडळकरांनी अजितदादांवर बोलूच नये, भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनीच अजितदादांना मान्यता दिली आहे त्यामुळे त्यांनी मानायचं की नाही? हा प्रश्न येतोच कुठून? असा सवाल रुपाली ठोंबरे पाटील यांनी केला आहे.
Priya Bapat Birthday: रोमान्स अन् कॉमेडीचा तडका लावणारे मराठी ऑनस्क्रीन कपलबद्दल जाणून घ्या…
तसेच जातीचं सोनं करणारी काही लोकं असतात, तर काही लोकं माती करणारी लोकं असतात तसेच गोपीचंद पडळकर आहेत. पडळकर फक्त पवार कुटुंबार टीका करुन प्रसिद्धी मिळवताहेत, बारामतीतून अजितदादा दीड ते दोन लाखांपेक्षा अधिक मताने निवडून आले बारामतीत धनगर समाज मोठ्या संख्येने आहे, त्यामुळे कुत्रंही पडळकरांना भीक घालणार नसल्याचंही त्या म्हणाल्या आहेत.
Brazil Plane Crash : ब्राझीलमध्ये विमानाचा भीषण अपघात! 14 प्रवाशांच्या मृत्यूने खळबळ
गोपीचंद पडळकरांच्या वक्तव्यानंतर उपमुख्यंमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे कारवाईची मागणी पत्र लिहुनच करणार असून फडणवीस यांनी याची दखल घेऊन त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी करणार असल्याचंही ठोंबरे पाटील यांनी स्पष्ट केलं आहे.
दरम्यान, आम्ही राजकारणात कसं वागायचं याचं ज्ञान आम्हाला असून गोपीचंद पडळकर यांनी अशीच वक्तव्ये सुरु ठेवली तर त्यांना जशास तसं उत्तर देणार असल्याचा इशाराही रुपाली ठोंबरे पाटील यांनी दिला आहे. अजित पवारांवर खालच्या भाषेत टीका केल्यानंतर राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून गोपीचंद पडळकरांचा चांगलाच समाचार घेतला जात आहे. आता रुपाली ठोंबरेंच्या विधानावर गोपीचंद पडळकर नेमकं काय बोलणार? हे पाहणं महत्वाचं ठरेल.