Udhav Thackeray On Pm Narendra Modi : माझ्या सेनेला नकली सेना म्हणतायं, तुमच्यासोबत गद्दारांची अन् गाढवांची सेना त्यांना सेना मानता का? या शब्दांत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Udhav Thackeray) उद्धव ठाकरेंची टीका म्हणजे सूर्याकडे थोबाड करून थुंकण्याचा प्रकार; फडणवीसांचे टीकास्त्रयांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना (Pm Narendra Modi) सुनावलं आहे. दरम्यान, सोलापुरात आयोजित सभेत बोलताना पंतप्रधान मोदींनी उद्धव ठाकरेंच्या सेनेचा नकली शिवसेना असा उल्लेख केला होता. त्यावरुन उद्धव ठाकरेंनी थेट मोदींना सुनावलं आहे. ते बारामतीत आयोजित सभेत बोलत होते.
‘भटकती आत्मा’ नेमकं कोण? पुढच्या सभेत मोदींना विचारणार; अजितदादांची सावध प्रतिक्रिया
उद्धव ठाकरे म्हणाले, माझ्या सेनेला नकली सेना म्हणता, अन् तुमच्यासोबत गद्दार अन् गाढवांची टोळी त्यांना सेना मानता का? आज जर न्याय लावला तर तुम्ही जे बोलला होतात नॅशनल करप्ट पार्टी आता राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेची दोन्ही चिन्हे तुमच्याकडेच आहेत तर मग ही पक्ष चिन्हे कशी चालतात तुम्हाला? एक अकेला सबपे भारी सोबत सगळे भ्रष्टाचारी, या शब्दांत उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सुनावलं आहे.
Covishield Covid Vaccine घेणाऱ्यांसाठी चिंताजनक बातमी; कंपनीकडून दुष्परिणामांची कबूली
‘वखवखलेला आत्मा’ गुजरातमध्ये जन्मला :
महाराष्ट्रात आज तुम्हाला ठाण मांडून बसण्याची वेळ आलीयं पण महाराष्ट्र गद्दार नाही. राज्याची परंपरा शूरांना वंदन करायची आहे. शूर आम्ही वंदीले…पण चोरामी वंदीले असं भाजपचं सुरु आहे. तुम्हा चोरांना ते वंदन करतात. एक वखवखलेला आत्मा गुजरातमध्ये जन्मलेला तो आग्रामार्गे महाराष्ट्रावर चालून आला. शिवरायांचं स्वराज्य चिरडून टाकायला आला होता. 57 वर्षे तो महाराष्ट्रात आला होता, त्याचा आत्मा अजूनही भटकत असेल, अशी सडकून टीकाही उद्धव ठाकरेंनी केलीयं.
जशी भटकती आत्मा असते, तसाच वखवखलेला आत्माही :
जशी भटकती आत्मा असते, तसाच वखवखलेला आत्माही असतो, विभुक्षित आत्माही असतो. हा वखवखलेला आत्मा सगळीकडे जातो. सगळीकडे म्हणजे पवारांना त्यांच्या मुलीला मुख्यमंत्री करायचंय, मला माझ्या मुलाला मुख्यमंत्री करायचं अन् हे स्वत:साठी लढतात, मी माझं माझ्यासाठी अन् सगळी कामे मित्रांसाठी, मुख्यमंत्री होणं हे जनता ठरवत असते. एका फोनवर जसं तुम्ही शाहा, त्यांच्या मुलाला बीसीसीआयचा अध्यक्ष केलं तसं नाहीये, हा वखवखलेला आत्मा राज्यात सगळीकडे फिरतोयं, वखवखलेल्या आत्म्याला संवदेना असतील तर तुमच्या नादानपणामुळे ज्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यात त्यांच्या घरात तुटलेल्या मंगळसुत्राकडे पाहा, या शब्दांत उद्धव ठाकरे यांनी मोदींचा समाचार घेतला आहे.