पुणे : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी लोकसभेत सन २०२३-२४ साठी सादर केला. यामध्ये प्रामुख्याने कोविडमध्ये नुकसान झालेल्या छोट्या व्यापाऱ्यांना भरपाई देणे, एमएसएमई सेक्टरसाठी स्पेशल पकेजची घोषणा, विविध कर रिर्टन भरणे आता सोपे होणार इ. सकारात्मक गोष्टींमुळे हा अर्थसंकल्प समाधानकारक आहे, अशी भावना पुण्यातील व्यापाऱ्यांनी व्यक्त केली.
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प सादर केला आहे. यावर प्रतिक्रिया देताना दि पूना मर्चंटस् चेंबरचे अध्यक्ष राजेंद्र बाठिया यांनी सांगितले की, चेंबरने अर्थसंकल्पापूर्व ज्या मागण्या केल्या होत्या. त्यापैकी सर्वसामान्यांच्या आयकराच्या करमाफ मर्यादेत वाढ केली आहे. तसेच उच्च उत्पन्न वर्गावरील सरचार्जमध्ये कपात केलेली आहे. भरडधान्य उत्पादन तसेच डाळी कडधान्ये यांच्या उत्पन्नासाठी विशेष योजना जाहीर केली आहे. अग्रो स्टार्टअपसाठी फंडाची तरतुद केलेली आहे. पर्यंटनाचा विकास तसेच इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट यामध्ये मोठी तरतूद केली आहे. त्यामुळे एकूणच व्यवसायासाठी सकारात्मक वातावरण निर्माण होणार आहे.