Amit Shah : भारतीय जनता पार्टीचं अधिवेशन आज पुण्यातील बालेवाडीत (Amit Shah) होत आहे. या अधिवेशनाच्या दुपारच्या सत्रात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी उपस्थितांना संबोधित केले. लोकसभा निवडणुकीत पिछेहाट झाल्याने कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांत निराशा निर्माण झाली होती. ही निराशा झटकून कार्यकर्त्यांना टॉनिक देण्याचं काम अमित शहांनी केलं. आता डोकं धरुन बसू नका. लोकसभा निवडणुकीतील थोडीशी राहिलेली कसर आता विधानसभा निवडणुकीत भरून काढा. या निवडणुकीत विजय आपलाच होणार आहे हे मला स्पष्ट दिसत आहे, असा विश्वास अमित शाह यांनी व्यक्त केला.
या अधिवेशनात राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव, केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांच्यासह प्रदेश भाजपमधील अनेक दिग्गज मंत्री, आमदार, खासदार, नेते, आजी, माजी आमदार, खासदार उपस्थित आहेत. अमित शहा यांना आपल्या भाषणात विरोधकांवर घणाघाती टीका केली. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावरही जोरदार निशाणा साधला आहे.
खडसेंनी घेतली अमित शाहांची भेट; फडणवीसांना धक्का देत कमबॅकची तयारी?
शाह पुढे म्हणाले, कार्यकर्त्यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा करत लोकसभा निवडणुकीत विजय मिळवून दिला. नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान बनले. महाराष्ट्रात 2024 मध्ये सर्वात मोठा विजय मिळवायचा. मी बऱ्याच पदाधिकाऱ्यांना काल भेटलो. थोडा गोंधळ वाटतोय याचं कारण म्हणजे विरोधकांना चुकीच्या गोष्टी पसरवल्या आहेत त्याचा आहे. तरी देखील आपला विजय झाला आहे. आपण जिंकलो पण विरोधक अहंकारी झाल्यासारखे दिसत आहेत.
आपण जिंकूनही निराश असल्यासारखे वाटतोय. आणि दुसरीकडे पराभवानंतरही राहुल गांधी अहंकारी झालेत. भाजपला 240 आणि एनडीएला 300 मिळाल्या. हे लक्षात ठेवा. निवडणुकीत लोकांनी मोदींच्या दहा वर्षांच्या कामकाजावर मोहोर उमटवली. तरी देखील बहुमत मिळालं नाही याची खंत वाटतेय पण डोकं धरून बसू नका. आता विधानसभेत सगळी कसर भरून काढा. हताश होऊ नका. लोकसभेतील मोठा विजय आहे. महाराष्ट्रातही 2024 मध्ये सर्वात मोठा विजय होणार आहे. भाजपाच्या नेतृत्वात महायुतीचं सरकार येणार आहे.यासाठी संकल्प करा, असे आदेशच अमित शाह यांनी यावेळी दिले.
राष्ट्रवादीच्या नाड्या आता मोहोळ यांच्या हाती; अमित शाहांसोबत बघणार सहकार खाते