Download App

Video : बाजीराव पेशवेंच्या स्मारकासाठी पुण्यातील एनडीएच योग्य; अमित शाहांचं शिक्कामोर्तब

एनडीए हे प्रेरणास्थान हे देशाच्या सुरक्षेचं म्हणूनच पेशवा बाजीरावांचा अश्वारूढ पुतळा उभारला जाणं हे सर्वाधिक योग्य आहे.

Amit Shah in Pune : पुण्यातील भूमी स्वराज्याच्या संस्कारांचे उगमस्थान आहे. इंग्रजांनी इतिहासातल्या अनेक नायकांवर अन्याय केला. 17 व्या शतकात इथूनच पेशव्यांनी मराठा साम्राज्याने अटकेपार झेंडे लावले. एनडीए हे प्रेरणास्थान हे देशाच्या सुरक्षेचं म्हणूनच पेशवा बाजीरावांचा अश्वारूढ पुतळा उभारला जाणं हे सर्वाधिक उचित आहे, असं अमित शाह (Amit Shah in Pune) यांनी म्हटलं आहे. श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांच्या पुतळ्याचे अनावरण केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते झाले. यावेळी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार, केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ, मंत्री चंद्रकांत पाटील, खासदार मेधा कुलकर्णी आदी उपस्थि होते.

अमित शाह पुढे म्हणाले, सतराव्या शतकात येथून स्वराज्याची ज्योत पेटली होती. इंग्रजांसमोर पुन्हा एकदा लढण्याची वेळ आली त्यावेळी पहिली गर्जना लोकमान्य टिळकांनी केली. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी महाराष्ट्राच्या भूमीतूनच असे उदाहरण दिले की एक व्यक्ती आपल्या जीवनात देशासाठी काय करु शकतो हे दाखवून दिले. पेशवा बाजीरावांचे अनेक पुतळे देशभरात आहेत. माझ्या गावातही आहे. पण त्यांचं स्मारक बनवण्याची जागा पुण्यातील एनडीएतच आहे.

देश आणि स्वराज्यासाठी थोरल्या बाजीराव पेशव्यांना अनेक लढाया केल्या. बाजीराव यांची वीरता आणि महानता वर्णन करण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत. पण माझ्या जीवनात निराशा येते त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज आणि बाजीराव पेशव्यांचा विचार येतो आणि माझी निराशा दूर निघून जाते. देशाच्या सुरक्षिततेसाठी जे काही करता येईल ते नक्कीच करू. ऑपरेशन सिंदूरचं उदाहरण आपल्यासमोर आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वप्नातील भारत तयार करण्याची जबाबदारी 140 कोटी भारतीयांची आहे. स्वराज्यासाठी संघर्ष करण्याची गरज होती तेव्हा संघर्ष केला. स्वराज्य टिकवण्यासाठी गरज पडली तर आम्ही संघर्ष करू असे अमित शाह यांनी सांगितले. अफगाणिस्तान, बंगाल, कटकपर्यंत बाजीरावांनी विस्तार केला. मराठा सामाजाचे विघटन झाल्यानंतरही पेशव्यांनी स्वराज्य पुढे नेलं. बाजीरावांनी बुंदेलखंड, तंजावूर, गुजरातपर्यंत स्वराज्य नेलं. जदुनाथ सरकार म्हणाले बाजीराव यांचा जन्म घोड्यासह झाला होता. बाजीरावांनी मिळवलेला विजय कल्पनेपलीकडचा होता.

बाजीराव यांच्या पुतळ्यापासून अनेकांना प्रेरणा मिळेल. काही युद्धनीती कालबाह्य होत नाहीत. सध्याची युद्धनीती आणि बाजीरावांची युद्धनीती यामध्ये साम्य आहे. बाजीरावांनी २० वर्षांत ४१ लढाया लढून त्या सर्व जिंकल्या. पराभव निश्चित मानल्या जाणाऱ्या लढाया बाजीरावांनी जिंकल्या. त्यामुळे त्यांच्यासारखा सेनापती दुसरा नाही. त्यांचे संपूर्ण आयुष्य लढाया लढण्यात गेले. त्यांनी मिळविलेला विजय कल्पने पलिकडचा होता.

follow us