पुणे : अमेरिकेतील बर्गर किंग या बहुराष्ट्रीय कंपनीवर पुण्यातील बर्गर किंग (Burger King) भारी पडला आहे. 13 वर्ष जुन्या खटल्यात पुण्यातील बर्गर किंगने कायदेशीर लढाई जिंकली आहे. बर्गर किंग नावावरून अमेरिकन कंपनी आणि पुण्यातील बर्गर किंग आउटलेट यांच्यात कोर्टात लढा सुरू होता. त्यानंतर अखेर 13 वर्षांनंतर कोर्टाने पुण्याच्या बर्गर किंगच्या बाजूने महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. पुणे जिल्हा न्यायालयाने अमेरिकन कंपनीचा दाव फेटळत पुण्यातील स्थानिक कंपनीला आहे त्याच नावाने हॉटेल चालवण्याची परवानगी दिली आहे. त्यामुळे अमेरिकन बर्गर किंगसमोर पुण्यातील बर्गर किंग भारी पडल्याची चर्चा सध्या शहरभर सुरू आहे. (US Giant Burger King Loses Trademark Infringement Suit Against Punes Iconic Burger King)
विधानसभेच्या तोंडावर जु्न्या वादाला रोहित पवारांकडून नवी फोडणी; मोदींचंही घेतलं नाव
नेमकं प्रकरण काय?
पुण्यातील कॅम्प परिसरात बर्गर किंग नावाने एक आऊटलेट आहे. जे शापूर आणि अनाहिता इराणी हे जोडपे चालवते. मात्र, या जोडप्यावर अमेरिकन कंपनी बर्गर किंग कॉर्पोरेशनने साधारण 13 वर्षांपूर्वी कायदेशीर खटला दाखल केला. यात संबंधित कंपनीने पुण्यातील रेस्टॉरंटला ‘बर्गर किंग’ हे नाव वापरू नये अशी मागणी करण्यात आली होती. याचिकेत अमेरिकन कंपनीने ट्रेडमार्कचे उल्लंघन आणि त्यामुळे झालेल्या आर्थिक नुकसानीचा हवाला देत खटला दाखल केला होता.
US Giant 'Burger King' Loses Trademark Infringement Suit Against Pune's Iconic 'Burger Kinghttps://t.co/fmqnjfWsHU
— Live Law (@LiveLawIndia) August 19, 2024
न्यायालयात काय झालं?
सुमारे 13 वर्ष चाललेल्या कायदेशील लढाईत 16 ऑगस्ट रोजी पुणे जिल्हा न्यायालयाने अमेरिकन कंपनीचा दावा फेटाळून लावला. तसेच पुण्यातील बर्गर किंगला आहे त्याच नावाने व्यवसाय सुरू ठेवण्याचे आदेश दिले. या सर्व प्रकरणाच्या सुनावणीवर न्यायमूर्ती वेदपाठक यांनी पुण्याचा बर्गर किंग 1992 पासून नाव आणि ट्रेडमार्क वापरत आहे, जेव्हा अमेरिकन कॉर्पोरेशनने भारतात आपला ट्रेडमार्क नोंदणी केला नव्हती असे महत्त्वपूर्ण निरीक्षण नोंदवले.
Bigg Boss Marathi: ‘बिग बॉस मराठी’च्या घरात सत्याचा पंचनामा; जबरदस्त कल्ला होणार
याशिवाय न्यायालयाने सांगितले की, आंतरराष्ट्रीय कंपनीने भारतात जवळपास 30 वर्षांपासून या नावाने काम केले नाही, तर पुण्यातील रेस्टॉरंटने ‘बर्गर किंग’ या नावाने सातत्याने सेवा दिली आहे. अमेरिकन बर्गर किंगची स्थापना 1954 मध्ये झाली आणि 2014 मध्ये भारतात प्रवेश केला. त्यावेळी संबंधित कंपनीच्या लक्षात आले की, आपल्या नावासारखेच एक आऊटलेट पुण्यात सुरू आहे.
UPSC Recruitment : 45 पदांसाठी थेट भरती अन् लाखात पगार; खाजगी नोकदारही करू शकणार अर्ज
यानंतर अमेरिकन कंपनीने दावा दाखल करत पुण्यातील बर्गर किंग या नावाच्या स्थानिक रेस्टॉरंटमुळे आपल्या ब्रँडची प्रतिष्ठा खराब होत असल्याचे सांगितले. मात्र, पुण्याच्या बर्गर किंगने ट्रेडमार्कचे उल्लंघन केल्याचे सिद्ध करण्यात अमेरिकन कंपनी अपयशी ठरली. या सुनावणीदरम्यान न्यायालयाने अमेरिकन कंपनी बर्गर किंग कॉर्पोरेशनने दाखल केलेला 2011 चा खटलादेखील फेटाळून लावली आहे. फिर्यादी कंपनीच्या ट्रेडमार्कचे उल्लंघन आणि वास्तविक नुकसान यासंबंधी कोणताही पुरावा नसल्यामुळे, यूएस कंपनी कोणत्याही नुकसानीस पात्र नसल्याचेही न्यायालयाने म्हटले आहे.