Anjali Damani On IG Jalidar Supekar : वैष्णवी हगवणे हत्याप्रकरणात आता नवनवीन खुलासे होत असताना दुसरीकडे सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया (Anjali Damania) यांनी एक्सवर एक सुसाईड नोट शेअर केली आहे. दमानियांच्या या पोस्टमुळे मोठी खळबळ माजण्याची शक्यता आहे. दमानिया यांनी शेअर केलेल्या पोस्टमध्ये वैष्णवी हगवणेचा नवरा शशांक हगवणेचे मामा IG जालिंदर सुपेकर हेदेखील त्यांच्या सहकाऱ्यांचा छळ करायचे असे म्हणत दामानियांनी अशोक सादर या व्यक्तीची सुसाईड नोट पोस्ट केली आहे. यामुळे आता सुपेकरांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.
वैष्णवी च्या नवऱ्याचे मामा IG जालिंदर सुपेकर हे सुद्धा त्यांच्या सहकाऱ्यांचा छळ करायचे.
ही अशोक सादरे ह्यांची सुसाइड नोट. ह्या PSI अशोक सदरेंना जालिंदर सुपेकरांनी दोन महिन्याच्या पैशाच्या कलेक्शन दिले नाही म्हणून व दिवाळीचे सोन दिले नाही म्हणून अतोनात मानसिक छळ केला आणि… pic.twitter.com/0E9dr5UWcu
— Mrs Anjali Damania (@anjali_damania) May 23, 2025
दामानियांची पोस्ट नेमकी काय?
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म असलेल्या एक्सवर पोस्ट करताना दामानियांनी लिहिले आहे की, वैष्णवीच्या नवऱ्याचे मामा IG जालिंदर सुपेकर हे सुद्धा त्यांच्या सहकाऱ्यांचा छळ करायचे. ही अशोक सादरे ह्यांची सुसाइड नोट. ह्या PSI अशोक सदरेंना जालिंदर सुपेकरांनी दोन महिन्याच्या पैशाच्या कलेक्शन दिले नाही म्हणून व दिवाळीचे सोन दिले नाही म्हणून अतोनात मानसिक छळ केला आणि त्यांमुळे अशोक सदरेंनी देखील आत्महत्या केली होती. इतकी बेकार माणस आहेत असे म्हणत दामानियांनी या पोस्टमध्ये @CMOMaharashtra व शिरखर परदेशी ह्यांना मी ही व ५०० कोटीच्या भ्रष्टाचाराची सखोल चौकशी व्हावी अशी विनंती केली आहे.
Video : वैष्णवी हगवणे प्रकरण गाजत असताना बावधन पोलिसांनी अवघ्या दोन मिनिटांत गुंडाळली प्रेस
500 कोटींच्या घोटाळ्याचा आरोप असणारे वैष्णवीचे मामासासरे
वैष्णवीच्या नवऱ्याचे मामा हे आयजी आहेत. त्यांची मी माहिती घेतली असून या मामांचा धाक दाखवून दोन्ही सुनेवर हगवणे कुटुंबियांनी अत्याचार केल्याचा दावा दमानियाांनी केला. जालिंदर सुपेकर या शशांकच्या आयजी मामावर 500 कोटींच्या स्कॅम संदर्भात चौकशी सुरू आहे. मयुरी जगताप ही हगवणेंची मोठी सून आहे. तिने पोलिस स्टेशनमध्ये एफआयआरवेळी देखील हगवणे कुटुंब फरार होते. तेव्हा वैष्णवीच्या नणंदेने पोलिस स्टेशनमध्ये जाऊन तक्रार दाखल केली होती.
अजितदादा हगवणे प्रकरणावर बोलताना गंभीर नव्हते; पत्रकाराचा प्रश्न अन् फडणवीस दादांसाठी बनले ‘ढाल’
म्हणजे, फरार व्यक्ती पोलिस स्टेशनमध्ये जाते आणि मुयरीच्या आई आणि भावाविरुद्ध एफआयआर दाखल करते आणि नंतर पुन्हा गायब होते. तसंच तू आमचं काहीही बिघडू शकत नाही, आमचे हात फार मोठे आहेत, अशी धमकी देते, अशी माहिती अंजली दमानिया यांनी माध्यमांशी बोलताना दोन दिवसांपूर्वी दिली होती. तर, दुसरीकडे एका वृत्तवाहिनीशी बोलताना हगवणे कुटुंबीय हे माझे दूरचे नातेवाईक असून, त्यांच्याशी निगडित प्रकरणात माझा कसलाही संबंध नाही. त्यासोबतच गेल्या कित्येक महिन्यांपासून आमचा त्यांच्याशी संवादही झालेला नसल्याची प्रतिक्रिया सुपेकर यांनी दिली होती.
वैष्णवीच्या नवऱ्याचे (शशांक हगवणे) ह्यांचे मामा IG जालिंदर सुपेकर ह्यांच्यावर देखील ५०० कोटीच्या घोटाळ्याची चौकशी जानेवारी २०२५ पासून चालू आहे. pic.twitter.com/iFt0G7MIN9
— Mrs Anjali Damania (@anjali_damania) May 22, 2025