वैष्णवी हगवणे प्रकरणात नवा ट्विस्ट, मामेसासऱ्यांचा दबाव, दमानियांचे IG अधिकाऱ्यांकडे बोट

वैष्णवी हगवणे प्रकरणात नवा ट्विस्ट, मामेसासऱ्यांचा दबाव, दमानियांचे IG अधिकाऱ्यांकडे बोट

Anjali Damania on Vaishnavi Hagawane : वैष्णवी हगवणे (Vaishnavi Hagawane) या विवाहितेच्या मृत्यू प्रकरणामुळे राज्यात संतापाची लाट उसळली आहे. हुंड्यासाठी वैष्णवीला तिच्या सासरचे लोक त्रास द्यायचे, त्या छळाला कंटाळून तिने आत्महत्या केल्याचे म्हटलं जातंय. पण तिची आत्महत्या झाली नसून हत्या झाली. तसेच राजेंद्र हगवणे (Rajendra Hagawane) हे अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी होते. त्यामुळंच पोलिसांवर दबाव टाकून त्यांच्याकडून हे प्रकरण दाबलं जात असल्याचा आरोप वैष्णवीच्या वडिलांनी केला होता. आता सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया (Anjali Damania) यांनी या प्रकरणात एका आयजी अधिकाऱ्यांकडे अंगुलीनिर्दश केलेत.

वेळ अन् पद्धत आमचं सैन्य ठरवणार! PM मोदींचा पाकिस्तानला उघड इशारा, दहशतवादाविरोधात भारताची त्रिसूत्री

दमानिया यांनी दावा केला की वैष्णवीच्या नवऱ्याचे मामा हे आयजी आहेत. त्यांची मी माहिती घेतली असून या मामांचा धाक दाखवून दोन्ही सुनेवर हगवणे कुटुंबियांनी अत्याचार केल्याचा दावा दमानियाांनी केला. जालिंदर सुपेकर या शशांकच्या आयजी मामावर 500 कोटींच्या स्कॅम संदर्भात चौकशी सुरू आहे. एवढंच नाही तर जळगावमध्ये पीएसआय सादर जे होते, त्यांनी आपल्याला या आयजीनेच त्रास दिल्याचं पत्र लिहून आत्महत्या करणार असल्याचं म्हटलं होतं, अशी माहिती दमानियांनी व्हिडिओच्या माध्यमातून दिली.

आधी बिश्नोई गॅंगकडून धमकी, आता सलमान खानच्या इमारतीत घुसखोरी, संशयीताला घेतले ताब्यात… 

जालिंदर सुपेकर हे पोलिस महानिरीक्षक असून ते वैष्णवीचे मामेसासरे आहेत. मयुरी जगताप ही हगवणेंची मोठी सून आहे. तिने पोलिस स्टेशनमध्ये एफआयआरवेळी देखील हगवणे कुटुंब फरार होते. तेव्हा वैष्णवीच्या नणंदेने पोलिस स्टेशनमध्ये जाऊन तक्रार दाखल केली होती. म्हणजे, फरार व्यक्ती पोलिस स्टेशनमध्ये जाते आणि मुयरीच्या आई आणि भावाविरुद्ध एफआयआर दाखल करते आणि नंतर पुन्हा गायब होते. तसंच तू आमचं काहीही बिघडू शकत नाही, आमचे हात फार मोठे आहेत, अशी धमकी देते, अशी माहिती अंजली दमानिया यांनी दिली.

मला असं वाटतं की हे कुटुंब अतिशय विकृत मानसिकतेचं आहे. यामध्ये सरकारने कारवाई केली पाहिजे, अशी मागणी दमानिया यांनी केली.

खूप कठोर शिक्षा झाली पाहिजे…
वैष्णवीचे सगळ्यात ज्यास्त हाल तिच्या नणंद म्हणजे करिश्मा हगवणे करायच्या आणि त्यांच्यामुळे सासू लता आणि राजेंद्र हगवणे हे दोन्ही सूनांना छळायचे अशी माहिती मिळाली आहे. फरार होण्याची ही पहिली वेळ नाही. एवढेच नाही तर दुसऱ्या सुनेने तक्रार दाखल केली तेव्हा देखील ही माणस फरार झाली होती. सुनांनाच नाही तर सुशीलला देखील छळल जायचं. ह्या कुटुंबाला खूप खूप खूप कठोर शिक्षा झाली पाहिजे. मला हा खालचा फोटो खूप संशयास्पद वाटतोय. हे काहीतरी वेगळे आहे, असं ट्वीट दमानिया यांनी केलं.

तीन आरोपींना अटक
दरम्यान, वैष्णवी हगवणे प्रकरणात पोलिसांनी तीन आरोपींना अटक केलीये, तर सासरे राजेंद्र हगवणे आणि थोरला दीर अद्याप फरार आहेत. या प्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पोलिसांना आरोपींच्या अटकेचे निर्देश दिलेत.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube