वैष्णवी हगवणेंचं बाळ आजी-आजोबांकडे, अजितदादांच्या दोन महिला नेत्यांनी कामगिरी बजावली

Baby should be handed over to Kaspate Ajit Pawar’s Instructions : वैष्णवी हगवणेच्या (Vaishnavi Hagawane) मृत्युंनंतर वैष्णवीचे नऊ महिन्यांचे बाळ आईपासून पोरकं झालंय. मात्र आईच्या मृत्युंनंतर ते बाळ कुठे गायब केल्याचा दावा केला जात होता. याबाबत वैष्णवीच्या मामांनी धक्कादायक माहिती दिली होती. वैष्णवीचे बाळ निलेश चव्हाण नावाच्या व्यक्तीकडे असल्याचा (Ajit Pawar ) दावा त्यांनी केला होता. अखेर पोलिसांनी हे बाळ ताब्यात घेतलंय.
बाळ कस्पटेंकडे सोपवा, अशा स्पष्ट सूचना अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या (NCP) दोन महिला नेत्यांना केल्या होत्या. त्यानंतर बाळ ताब्यात घेऊन कस्पटे कुटुंबाकडे सोपविण्यात आलंय. वैशाली नागवडे आणि रुपाली पाटील यांना कस्पटेंच्या घरी जाऊन बाळ सोडवायला अजित पवारांनी सांगितलं होतं. त्याप्रमाणे बाळ कस्पटेंच्या घरी पोहोचविण्यात आले. बाळाला पाहून मात्र आजी-आजोबांना अश्रू अनावर झाले होते.
उपमुख्यमंत्री अजित पवारांनी राष्ट्रवादीच्या दोन महिला नेत्यांना बाळ कस्पटेंकडे सोपवण्याच्या सुचेना केल्यात.#RajendraHagawane #NCP #AjitPawar #VaishnaviHagavane #Pune pic.twitter.com/DB6mY8q3PD
— LetsUpp Marathi (@LetsUppMarathi) May 22, 2025
वैष्णवीचं बाळ हे हगवणे यांच्या नातेवाईकांकडे होतं. रूपाली पाटील यांनी हगवणे यांच्या नातेवाईकांना ते बाळ एकतर बावधन पोलीस स्टेशनला घेऊन या, नाहीतर कस्पटे यांच्या हवाली करा. अन्यथा तुमच्यावर बाळ पळून घेऊन गेलात म्हणून कायदेशीर कारवाई करण्यात येणार, असं सांगितलं होतं. अखेर बाळ सुखरूप कस्पटे कुटुंबाच्या हवाली करण्यात आलंय.
आधी झेलेन्स्की आता रामाफोसा! व्हाइट हाउसमध्ये पुन्हा हायहोल्टेज ड्रामा; वादाचं कारणही धक्कादायक..
निलेश चव्हाण हा वैष्णवीचा पती शशांक हगवणे याचा बिजनेस पार्टनर असल्याची माहिती समोर येत आहे. पुण्यातील कर्वेनगर भागातील औदुंबर सोसायटीत चव्हाण राहायला असल्याची माहिती मिळतेय. वैष्णवीच्या मृत्युंनंतर तिच्या बाळात आपल्या मुलीला बघणाऱ्या कस्पटे कुटुंबाला बाळाचा ताबा भेटला नव्हता. इतकेच नाही, तर ज्यावेळी आम्ही बाळ आणायला गेलो तर तिथे चव्हाण याने आम्हला बंधूकीचा धाक दाखवून तुमचा आणि बाळाचा काही संबंध नाही, बाळाचा ताबा हवा असेल तर कोर्टात जा, असे म्हणून त्याने बंदूक दाखवल्याने आम्ही तिथून निघून आलो, असं देखील कस्पटे कुटुंबाने सांगितलं होतं.