राजेंद्र हगवणे यांची राष्ट्रवादीच्या सर्व पदांवरून हकालपट्टी…दोषींवर कडक कारवाई करा, अजित पवारांचे निर्देश

Rajendra Hagawane Expelled From NCP Ajit Pawar Party : राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) पदाधिकारी राजेंद्र हगवणे यांची कालच राष्ट्रवादीच्या सर्व पदांवरून हकालपट्टी करण्यात आलेली (Ajit Pawar) आहे. पक्षातून देखील त्यांची हकालपट्टी करण्यात आली आहे, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते सुरज चव्हाण यांनी (Rajendra Hagawane) दिली आहे.
राजेंद्र हगवणे यांच्या घरात घडलेली घटना मानवतेला काळीमा फासणारी घटना आहे. याचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून निषेध व्यक्त करतो. वैष्णवी हगवणेला न्याय मिळाला पाहिजे, त्यांना ज्यांनी ज्यांनी त्रास दिला. त्यांच्यावर कडक कारवाई झाली (Vaishnavi Hagawane Death) पाहिजे, ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका आहे. माझा कार्यकर्ता किंवा पदाधिकारी कुठे चुकत असेल, तर त्याला टायरमध्ये घालून मारलं पाहिजे. ही भूमिका अजित पवारांनी वारंवार बोलून दाखवलेली आहे.
Dhule News : संजय राऊतांची पोस्ट अन् पोलिसांची धाड, शासकीय विश्रामगृहात कोट्यावधी रुपयांचं घबाड
कालच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्याच्या पोलीस (Pune Police) आयुक्तांना फोन करून त्यांच्यावर कडक कारवाई करावी, त्यांना त्वरित अटक करावी अशा सूचना दिल्या आहेत. कौटुंबिक वादाला पक्षाशी जोडून पक्षाची नाहक बदनामी करू नये, ही विनंती असल्याचं देखील सुरज चव्हाण यांनी म्हटलेलं आहे. राजेंद्र हगवणे यांची राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) मधून हकालपट्टी करण्यात आली आहे. त्यांच्या सुनेच्या मृत्यूप्रकरणात गंभीर आरोप झाल्यानंतर पक्षाने ही कारवाई केली आहे.
अपघातात मृत्यू झालायं, माझ्या घरी सांग; आत्महत्येपूर्वी निखिलचा मित्राला मेसेज…
पुण्यातील भुकूम येथे 16 मे रोजी वैष्णवी हगवणे (वय 23) यांनी आत्महत्या केली. त्यानंतर त्यांच्या वडिलांनी सासरच्या मंडळींवर हुंड्यासाठी मानसिक आणि शारीरिक छळ केल्याचा आरोप केला. एफआयआरनुसार, वैष्णवीच्या पती शशांक हगवणे, सासू लता हगवणे आणि नणंद करिश्मा हगवणे यांना अटक करण्यात आली आहे. सासरे राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील हगवणे हे अद्याप फरार आहेत.
या घटनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसने राजेंद्र हगवणे यांना पक्षातून बडतर्फ केल्याची माहिती युवक प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण यांनी दिली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दोषींवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. या प्रकरणामुळे समाजात संतापाची लाट उसळली असून, महिलांवरील अत्याचार आणि हुंडा प्रथा याविरोधात कठोर पावले उचलण्याची मागणी होत आहे.