अपघातात मृत्यू झालायं, माझ्या घरी सांग; आत्महत्येपूर्वी निखिलचा मित्राला मेसेज…

अपघातात मृत्यू झालायं, माझ्या घरी सांग; आत्महत्येपूर्वी निखिलचा मित्राला मेसेज…

Nikhil Somawanshi : ओलाच्या एआई कंपनीमध्ये इंजिनिअर पदावर नोकरी करणाऱ्या निखिल सोमवंशी (Nikhil Somawanshi) याने आत्महत्या केल्याची घटना घडलीयं. आत्महत्या करण्यापूर्वी निखिलने आपल्या मित्राला एक मेसेज पाठवला. माझा मृत्यू अपघातात झाला आहे, असं माझ्या कुटुंबियांना सांग असा मेसेज निखिलने मित्राला पाठवला होता. त्यानंतर आगरा तलावाच्या काठावर निखिल सोमवंशीचा मृतदेह आढळून आला आहे. कंपनीच्या कामकाजाच्या दबावामुळे निखिलने आत्महत्या केली असल्याचं सांगितलं जात आहे.

पुन्हा धो धो…, अहिल्यानगर, बीडसह ‘या’ जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी, जाणून घ्या हवामान विभागाचा अंदाज

इंडिया टुडेच्या माहितीनुसार निखिल सोमवंशी 7 मे रोजीच्या रात्री घरातून बाहेर निघाला. त्यानंतर निखिलने आपल्या रुममेटला एक मेसेज पाठवला. त्यात निखिलने म्हटलं, “मैं एक्सिडेंट में मर गया हूं..ये बात मेरे घर वालों को बता देना.” हा मेसेज वाचल्यानंतर रुममेट चक्रावून गेला. त्याने निखिलला फोन केला, मात्र फोन लागला नाही. त्यानंतर त्याने लिंक डिवाईसच्या मदतीने निखिलचे लोकेशन तपासले. लोकेशन ट्रॅक करत तो आगरा तलावाजवळ आला. तलावाच्या किनाऱ्यावर त्याला दोन चप्पला दिसून आल्या. त्याने तत्काळ पोलिसांना माहिती देत निखिलला शोधण्याचा प्रयत्न केला. मात्र, रात्रीच्या वेळी शोधमोहिम अयशस्वी ठरली. दुसऱ्या दिवशी पोलिसांना निखिलचा मृतदेह आढळून आला.

फडणवीसांनी अ‍ॅप्सद्वारे टॅक्सी बुक करण्याचे नियम केले कडक; मोठा दंड आकारला जाणार

जळगाव येथील रहिवासी निखिल सोमवंशीने IISC बंगळुरू येथून पदवीचं शिक्षण घेतलं. पीजी केल्यानंतर निखिलने चॅटबॉट प्रोजेक्टवर काम केलं. या घटनेनंतर रेडिटवर एका युजर्सने कंपनीवर गंभीर आरोप केले आहेत. कंपनीच्या कामाच्या पद्धतीमुळे आवश्यकतेपेक्षा अधिक कामाचा दबाव होता. या दबावासह निखिल सोमवंशीवर लीडरशीपची जबाबदारी देण्यात आली होती. या दबावाला कंटाळून अनेक कर्मचाऱ्यांनी नोकरी सोडली होती. या दबावाला कंटाळूनच निखिलने आत्महत्या केली असल्याचा दावा या युजर्सने केला आहे.

भुजबळ मंत्री झाले, शुभेच्छा देताना ठाकरेंचे शिलेदार दुभंगले; राऊतांची टीका, नार्वेकरांकडून अभिनंदन

आरोपांचं कंपनीकडून खंडन
निखिल सोमवंशी यांच्या मृत्यूवर कंपनीकडून आपली भूमिका स्पष्ट करण्यात आली आहे. ज्यावेळी निखिल सोमवंशीने आत्महत्या केली, त्यावेळी निखिल सुट्टीवर होता. प्रकृती ठीक नसल्याने निखिलने सुट्टी घेतली होती. निखिलच्या मृत्यूबद्दल कंपनीकडून संवेदना व्यक्त करण्यात येत आहे, मात्र कंपनीवर होत असलेल्या आरोपांवर कंपनीने कोणतंही प्रत्युत्तर दिलेलं नाही.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube