Bengaluru Stampede : बंगळुरुच्या पोलिस आयुक्तांचं निलंबन; मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचा मोठा निर्णय…

Bengaluru Stampede : बंगळुरुच्या पोलिस आयुक्तांचं निलंबन; मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचा मोठा निर्णय…

Bengaluru : रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (RCB) संघाने आयपीएलचे जेतेपद जिंकल्यानंतर बंगळुरुमधील चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर चेंगराचेंगरीची घटना घडली. या घटनेमध्ये तब्बल 11 जणांना आपला जीव गमवावा लागला. या घटनेप्रकरणी चहुबाजूंनी कर्नाटक सरकारवर टीका होत असल्याने आज कर्नाटक सरकारकडून मोठा निर्णय घेण्यात आलायं. चेंगरा-चेंगरी घटनेप्रकरणी बंगळुरुच्या पोलिस आयुक्तांचं निलंबन करण्याचा निर्णय मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी घेतलायं. तर या घटनेप्रकरणी समिती गठीत करण्यात आली असून पुढील 30 दिवसांत अहवाल सादर करण्याच निर्देश मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी दिले आहेत.

Video : आमची गाडी छान चाललीयं, तिघंही तीन शिफ्टमध्ये चालवतो; फडणवीसांची मिश्किल टिप्पणी…

चेंगरा चेंगरीच्या घटनेमुळे संबंधित वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आलंय. पोलिस आयुक्तांसह उपायुक्तांनादेखील निलंबित करण्यात आले आहे. तसेच देशाला हादरवून टाकणाऱ्या या दुर्घटनेची चौकशी राज्याचा गुन्हे अन्वेषण विभाग करणार असल्याचंही समोर येत आहे.

जीवघेणा जल्लोष! आरसीबीच्या रॅलीतील चेंगराचेंगरीची ‘पाच’ प्रमुख कारणे समोर; प्रशासन, सरकार अन्…

दरम्यान, 18 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर आरसीबीचा पहिला आयपीएल विजय हा राज्यात भावनिक मुद्दा होता. विजयानंतर बंगळुरुच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर संघाच्या सत्काराला उपस्थित राहण्यासाठी लोक उत्सुक होते. चाहत्यांनी स्टेडियममध्ये प्रवेश करण्यासाठी धडक दिल्याने घडलेल्या या दुर्घटनेत 11 जणांचा मृत्यू झाला आणि 47 जण जखमी झाले आहेत.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube