Virat Kohli : ‘किंग कोहली’ चा आणखी एक विक्रम; T20 क्रिकेटमध्ये14,000 धावांचा टप्पा पार

Virat Kohli : आयपीएल 2026 स्पर्धेत 13 मे रोजी खेळल्या गेलेल्या सामन्यात आरसीबीने केकेआरचा 6 विकेट्सने पराभव केला आहे. या सामन्यात भारतीय

Virat Kohli

Virat Kohli : आयपीएल 2026 स्पर्धेत 13 मे रोजी खेळल्या गेलेल्या सामन्यात आरसीबीने केकेआरचा 6 विकेट्सने पराभव केला आहे. या सामन्यात भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि स्टार खेळाडू विराट कोहलीने 105 धावांची नाबाद खेळी करत आणखी एक विक्रम आपल्या नावावर केले आहे. विराट आता टी20 क्रिकेटमध्ये 14 हजार धावांचा टप्पा गाठणारा सर्वात वेगवान खेळाडू ठरला आहे. तर आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक शतक (9) ठोकणारा खेळाडू आहे.

आयपीएल मधील 9 वे शतक

बुधवारी रायपूर येथे केकेआर विरुद्ध झालेल्या सामन्यात विराटने (Virat Kohli) शानदार शतक झळकावले. या सामन्यापूर्वी झालेल्या दोन सामन्यात विराट शून्यावर बाद झाला होता मात्र या सामन्यात त्याने शानदार खेळी करत संघाला विजय मिळून दिले. या खेळीसह, तो आयपीएलच्या (IPL) इतिहासात सर्वाधिक शतके करणारा खेळाडूही बनला आहे. या स्पर्धेत त्याच्या नावावर आता 9 शतके जमा झाली आहेत. आयपीएलमध्ये विराट नंतर जॉस बटलर (7), ख्रिस गेल (6), के.एल. राहुल (6) आणि संजू सॅमसनने (5) शतके झळकावली आहे.

तर दुसरीकडे टी20 क्रिकेटच्या इतिहासात सर्वाधिक शतके झळकावणाऱ्या खेळाडूंच्या यादीत विराट कोहली आता संयुक्तपणे तिसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. केकेआर विरुद्धच्या सामन्यात शतक करत त्याने डेव्हिड वॉर्नरच्या शतकांच्या संख्येची बरोबरी केली आहे. या यादीत 22 शतकांसह ख्रिस गेल पहिल्या स्थानी तर 13 शतकांसह बाबर आझम दुसऱ्या क्रमांकावर आहे.

‘टेरेरिस्ट’ चे स्पेलिंग लिहून दाखवा, मंत्री शिरसाटांच्या आरोपावर इम्तियाज जलीलांचं प्रत्युत्तर-

तर संयुक्तपणे विराट कोहली आणि डेव्हिड वॉर्नर 10 शतकांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे. तर राइली रुसो, साहिबजादा फरहान, क्विंटन डी कॉक आणि अभिषेक शर्मा 9 शतकांसह चौथ्या क्रमांकावर आहे.

follow us